Adhik Maas Purnima pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Adhik Maas Purnima: अधिक महिन्यातील पौर्णिमेला निर्माण होतोय दुर्मिळ योग... पैशाची कडकी कमी करण्यासाठी करा हा उपाय

Anirudha Sankpal

Adhik Maas Purnima: यंदा ३१ मे रोजी अधिक महिन्यातील पौर्णिमा एक अत्यंत दुर्मिळ योग घेऊन येत आहे. या दिवशी रवी योग आणि सद्विचार योग असे अनेक अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या महासंयोगावेळा काही खास उपाय तुमचे झोपलेले नशीब जागे करतील आणि घरात पैसा खेचला जाईल.

अधिक महिन्यातील पौर्णिमेचे महत्व

हिंदू कॅलेंजरनुसार अधिक महिा तीन वर्षातून एकदा येतो. हा महिना भगवान विष्णूंचा प्रिय महिना म्हणून मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला लक्ष्मी - नारायणाची पूजा करण्याने सामान्य दिवसांपेक्षा जास्त पटीनं अधिक फळ मिळतं. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, वायफळ खर्च होत असेल तर या दिवशी केले गेलेले उपाय थेट माता लक्ष्मीची कृपा दृष्टी मिळवून देतात अशी मान्यता आहे.

हे महासंयोग होत आहेत तयार

३१ मे २०२६ रोजी अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रवी योग निर्माण होत आहे. या योग सर्व प्रकारचे दोष नष्ट करतो. हा योग यश देणारा योग मानला गेला आहे. तसेच या दिवशी चंद्र आणि गुरू शुभ स्थितीमुळे इतर लाभकारी योग देखील तयार होत आहेत.

कोणते उपाय करावेत?

१ - अधिक महिन्यातील पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नान करून एका तांब्याच्या तांब्यात शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडे गंगाजल, चिमटभर हळद मिसळा. हे पाणी आपल्या घलाच्या मुख्य द्वारावर शिंपडा. त्यानंतर हळदीने स्वस्तिक काढा. यामुळं राहू दोष आणि नकारात्मक उर्जा दूर जाते.

२ - पिंपळाच्या झाडाला गोड पाणी आणि दिवा

पौर्णिमेच्या सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करणे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. या खास पौर्णिमेला थोडे पाणी, दूध आणि साखर किंवा गुळ मिसळून पिंपळाच्या मुळाला अर्पण करावं. यानंतर सायंकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक तुपाचा दिवा लावा. ज्योतिष शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू याचा वास असतो. यामुळे घरातील पैशाची चणचण दूर होते.

३ - लक्ष्मीला कवड्यां अर्पण

सायंकाळी घरातील देवाऱ्यात माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. पूजेवेळी लक्ष्मी मातेला ११ पिवळे कवडे आणि मखान्याचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यावर या कवड्या एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवावे. हा उपाय तुमचा बँक बॅलेन्स वेगाने वाढवतो.

४ - चंद्राला अर्घ्य

पौर्णिमेचा थेट संबंध हा चंद्राशी असतो. त्यामुळे रात्री चंद्र उगवल्यानंतर त्याला अर्घ्य द्या. एका तांब्यात पाणी थोडे कच्चे दूध, अक्षता आणि पांढरे फूल टाकून चंद्र देवाला अर्घ्य द्याऊन ओम सों सोमाय नमः असा मंत्रजाप करावा यामुळे मानसिक तणाव दूर होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT