

mangalwar angarki chaturthi sankashti chaturthi 2026 upay for success and wealth
पुढारी ऑनलाईन :
आज वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. ही चतुर्थी मंगळवारी आल्याने तीला अंगारकी म्हटले जाते. गणेश भक्तांमध्ये अंगारकी संकष्टीला विशेष महत्व आहे. त्यामुळे आज केलेल्या काही उपायांमुळे गणरायाची विशेष कृपा त्यांच्या भक्तांवर होउ शकते.
अंगारकी संकष्टीला विशेष महत्व आहे. 64 कलांचा अधिपती असणारा आणि बुद्धीदाता गणरायाला समर्पित या संकष्टीला भक्तांमध्ये महत्वाचे मानले जाते. ही चतुर्थी केल्याने स्थर्य, संपत्ती, मुलांना दिर्घायुष्य आणि संकटातून मुक्ती मिळते अशी भक्तांची धारणा आहे. या दिवशी केलेल्या काही खास उपायांमुळे गणरायाची कृपा भक्तांवर होउ शकते.
त्यातच आज मंगळवार असल्याने गणपती सोबतच हनुमानाची पूजा केल्याने त्याचे विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी गणपती आणि हनुमानाच्या केलेल्या पुजेमुळे जीवनातील संकटे नष्ट होतात. आर्थिक स्थर्य प्राप्त होते आणि जीवनात प्रगतीची दारे खुली होतात अशी भक्तांची धारणा आहे.
हिंदू धर्मात मंगळवार हा हनुमानाला समर्पित वार आहे. या दिवशी भक्त मंदिरात जाउन हनुमंतांचे दर्शन घेतात. हनुमान चालिसेचे पठण करतात. त्यातच आज मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने एक शुभ संयोग जुळून आला आहे. या दिवशी केलेल्या पुजेमुळे हनुमंतासोबतच गजाननाचीही कृपा होणार आहे.
गणरायाची विशेष कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी...
मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. गणरायाची पूजा करून गणपतीच्या मूर्तीला लाल रंगाचे फूल अर्पण करावे. दुर्वांची जुडी वहावी आणि 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा आणि विधीप्रमाणे गणरायाचे पूजन करून गणपतीची आरती म्हणावी. यावेळी ओम गं गणपतये नम: चा 108 वेळा जप केल्याने गणरायाची आपल्यावर विशेष कृपा होते. यामुळे जीवनातल्या अडचणी दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
धन आणि व्यवसायात वाढ होण्यासाठी हा उपाय करा :
मंगळवारच्या दिवशी अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी भगवान गणेशाच्या मूर्तीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा करा आणि “ॐ विघ्नेश्वराय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करा.
हा उपाय केल्यास अत्यंत उत्तम फळ प्राप्त होऊ शकते. जर तुम्ही सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असाल, तर हा उपाय नक्की करून पाहा. यामुळे पैशांची तंगी दूर होण्यास मदत होते आणि धनलाभाचे योग निर्माण होतात. तसेच या विशेष उपायामुळे जातकाच्या व्यवसायातही वाढ होऊ शकते.