Who Is Apple New CEO John Ternus Pudhari
अर्थभान

Who is John Ternus: ॲपल कंपनीचे नवे CEO जॉन टर्नस कोण आहेत? किती आहे संपत्ती? जाणून घ्या त्यांचा प्रवास

Who Is Apple New CEO John Ternus: Apple Inc. मध्ये मोठा बदल होणार असून जॉन टर्नस नवे CEO होणार आहेत. टिम कुक CEO पद सोडून एक्झिक्युटिव्ह चेअरमनची भूमिका स्वीकारतील.

पुढारी वृत्तसेवा

John Ternus Apple CEO: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Apple Inc. मध्ये मोठा बदल होणार आहे. जवळपास १५ वर्षे कंपनीचं नेतृत्व केल्यानंतर टिम कुक CEO पद सोडणार असून त्यांच्या जागी जॉन टर्नस हे १ सप्टेंबर २०२६ पासून नवे CEO म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. कुक आता ‘एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ म्हणून काम पाहणार आहेत.

जॉन टर्नस कोण आहेत?

जॉन टर्नस हे ॲपलचे हार्डवेअर इंजिनिअरिंग प्रमुख असून गेली दोन दशकं ते कंपनीत काम करत आहेत. त्यांनी २००१ साली ॲपलमध्ये प्रवेश केला आणि हळूहळू कंपनीतील सर्वात महत्त्वाच्या पदांवर ते पोहोचले. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे.

ॲपलमध्ये त्यांचा प्रवास

जॉन टर्नस यांनी सुरुवातीला मॅकच्या डिझाइन टीममध्ये काम केलं. नंतर ते कंपनीतील मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग बनले. आज त्यांच्या देखरेखीखाली iPhone, iPad, Mac, Apple Watch, AirPods आणि Vision Pro यांसारख्या महत्त्वाच्या उत्पादनांच्या हार्डवेअर टीम्स काम करतात. २०२१ मध्ये त्यांनी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून हार्डवेअर इंजिनिअरिंगची जबाबदारी सांभाळली आणि आता ते CEO पदावर पोहोचले आहेत.

जॉन टर्नस यांची संपत्ती किती?

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन टर्नस यांची अंदाजित संपत्ती सुमारे ७५ मिलियन डॉलर (सुमारे ६०० कोटी रुपये) आहे. CEO पदावर आल्यानंतर त्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

टिम कुक यांचा वारसा

टिम कुक यांनी २०११ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्यानंतर CEO पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली ॲपलची मार्केट व्हॅल्यू सुमारे $३५० अब्जवरून $४ ट्रिलियनपर्यंत पोहोचली.
Apple Watch, AirPods आणि सर्व्हिसेस बिझनेस यामुळे कंपनीने मोठी झेप घेतली.

नव्या CEO समोरची आव्हाने

जॉन टर्नस यांच्यासमोर आता मोठी आव्हाने उभी आहेत. कंपनीकडून नवीन इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्सची अपेक्षा आहे, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात. तसेच चीनवरील उत्पादन अवलंबित्व आणि जागतिक राजकीय तणावही कंपनीसाठी मोठा मुद्दा आहे. या बदलासोबत जॉनी स्रूजी यांना ‘चीफ हार्डवेअर ऑफिसर’ पदावर बढती देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT