Campbell VP Fired Indian Employee Abuse: अमेरिकेतील प्रतिष्ठित फूड कंपनी कॅम्पबेल (Campbell) मध्ये घडलेल्या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु झाली आहे. कंपनीने आपल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील व्हाइस-प्रेसिडेंट मार्टिन बेली यांना एका भारतीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून तत्काळ काढून टाकण्यात आलं आहे.
एका माजी कर्मचाऱ्याने कोर्टात तक्रार दाखल करत बेली यांनी भारतीय सहकाऱ्यांविषयी अत्यंत आक्षेपार्ह, वांशिक आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीने ही कारवाई केली आहे.
मिशिगनच्या वेन काउंटी सर्किट कोर्टात रॉबर्ट गार्झा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार,
नोव्हेंबर 2024 मध्ये वेतनवाढीबाबत चर्चा सुरू असताना बेली यांनी—
कॅम्पबेलच्या उत्पादनांना “गरीब लोकांसाठीचे प्रोसेस्ड फालतू फूड” म्हटले
भारतीय सहकाऱ्यांना “बावळट”, “विचार करू न शकणारे” असे म्हणत अपमानित केले
गार्झा यांनी न्यायालयात सांगितले की, या घटनेचे ऑडिओ रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे.
कॅम्पबेल कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे की, “बेली यांची भाषा अश्लील, आक्षेपार्ह आणि चुकीची होती. आमची कंपनी विविधता, समावेशकता आणि परस्पर सहकार्य या मुल्यांवर काम करते. अशी वागणूक आम्ही कधीही सहन करत नाही.”
कंपनीने सांगितलं की-
त्यांना या प्रकरणाची माहिती 20 नोव्हेंबरला मिळाली
ऑडिओक्लिपचे भाग ऐकून अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली
तपास सुरू असताना बेली यांना तत्काळ तात्पुरत्या सुट्टीवर पाठवण्यात आले
गंभीर प्रकरण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना थेट नोकरीवरून काढण्यात आले
तक्रारीनुसार, बेली यांनी म्हटले होते “भारतीय लोकांना काही कळत नाही. ते स्वतः विचार करू शकत नाहीत.” या वक्तव्यानंतर कंपनीवर टीका होत आहे.
वांशिक टिप्पणी,
सहकाऱ्यांचा अपमान,
आणि कंपनीविरोधी वक्तव्य
ही तीनही कारणे नोकरी जाण्यास पुरेशी ठरू शकतात, असा कडक मेसेज जागतिक कंपन्यांना मिळाला आहे.
या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वंश, जात, राष्ट्रीयता किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित अपमान सहन केला जात नाही. भारतीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या बेली यांना एका दिवसातच पदावरून हटवून कंपनीने जागतिक स्तरावर एक मेसेज दिला की, “कामाच्या ठिकाणी अपमान, भेदभाव किंवा गैरवर्तनासाठी जागाच नाही.”