UGC NET JRF 2025 Pudhari
अर्थभान

Salary Without Job: नोकरी न करता मिळवा 24 लाखांच पॅकेज! फक्त ही परीक्षा पास करा; सरकार देणार दरमहा पगार

UGC NET JRF 2025: भारतामध्ये यूजीसी नेट जेआरएफ परीक्षा पास केल्यास नोकरी न करता दरमहा ₹37,000 ते ₹42,000 इतका स्टायपेंड मिळतो. ही रक्कम संशोधन आणि शिक्षणासाठी सरकारकडून दिली जाते.

Rahul Shelke

UGC NET JRF 2025 Fellowship Earn 24 Lakh Without Job:

चांगली नोकरी हवी असेल, तर त्यासाठी उच्च शिक्षण आणि मेहनत घ्यावी लागते. पण कोणतीही नोकरी न करता तुम्हाला सरकार दरमहा पगार देऊ शकते? होय, हे शक्य आहे. भारतात अशी एक परीक्षा आहे जी पास केल्यावर तुम्हाला पाच वर्षांत 24 लाखांहून अधिक स्टायपेंड (फेलोशिप) मिळू शकतो. ही परीक्षा म्हणजे यूजीसी नेट (UGC NET) आणि त्यासोबतची जेआरएफ (JRF – Junior Research Fellowship).

UGC NET परीक्षा काय आहे?

यूजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) दरवर्षी National Eligibility Test (NET) ही परीक्षा घेतो.
या परीक्षेद्वारे उमेदवारांना महाविद्यालयात किंवा विद्यापीठात लेक्चरर, असिस्टंट प्रोफेसर म्हणून अर्ज करण्याची संधी मिळते. पण जर तुम्ही JRF (Junior Research Fellowship) साठी पात्र ठरलात, तर तुम्हाला सरकारकडून संशोधनासाठी दरमहा आर्थिक मदत (stipend) मिळते.

UGC JRF आणि SRF मध्ये किती पैसा मिळतो?

यूजीसीच्या 20 सप्टेंबर 2023च्या बैठकीत फेलोशिपची रक्कम वाढवण्यात आली. आता JRF (पहिले दोन वर्षे) साठी दरमहा ₹37,000 स्टायपेंड मिळतो. पूर्वी ही रक्कम ₹31,000 होती.

यानंतर उमेदवार Senior Research Fellowship (SRF) साठी पात्र ठरतो. SRF मध्ये पुढील तीन वर्षे दरमहा ₹42,000 दिले जातात (पूर्वी ₹35,000 होते).

कंटीजन्सी ग्रँट म्हणजे काय?

संशोधनाच्या खर्चासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांना अतिरिक्त ग्रँट मिळते.

  • मानव्य आणि समाजशास्त्रातील (Humanities/Social Science) विद्यार्थ्यांना

    • JRF साठी ₹10,000 आणि

    • SRF साठी ₹20,500प्रतिवर्ष मिळतात.

  • विज्ञान शाखेतील (Science) विद्यार्थ्यांना

    • JRF साठी ₹12,000आणि

    • SRF साठी ₹25,000 वार्षिक दिले जातात.

जर JRF चे दोन वर्षे, SRF ची तीन वर्षे आणि ही ग्रँट एकत्र केली, तर उमेदवाराला पाच वर्षांत ₹24 लाखांहून अधिक रक्कम मिळते. तीही कोणतीही नोकरी न करता, फक्त शिक्षण आणि संशोधनासाठी.

UGC NET परीक्षा कधी आहे?

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइटनुसार, यूजीसी नेट डिसेंबर 2025 परीक्षा 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत घेण्यात येईल. ही परीक्षा कंप्युटर बेस्ड (CBT) पद्धतीने देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहे. एनटीए लवकरच विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करेल. उमेदवारांनी नियमितपणे ugcnet.nta.nic.in वेबसाइट पाहावी.

अर्ज कसा करायचा?

  1. अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.

  2. होमपेजवर “UGC NET December 2025 Registration” लिंकवर क्लिक करा.

  3. आवश्यक माहिती भरून यूजरनेम आणि पासवर्ड तयार करा.

  4. लॉगिन करून फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

  5. ऑनलाइन फी भरून फॉर्म सबमिट करा आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.

अर्जाची फी किती आहे?

  • सामान्य (General) श्रेणीसाठी – ₹1,150

  • OBC-NCL / EWS साठी – ₹600

  • SC, ST, दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी – ₹325

फी क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरता येईल.

UGC NET JRF चे फायदे:

  • विद्यापीठात प्राध्यापक किंवा संशोधक होण्याची संधी

  • दरमहा ₹37,000 ते ₹42,000 फेलोशिप

  • संशोधनासाठी स्वतंत्र ग्रँट

  • PSU (ONGC, BHEL इत्यादी) मध्ये NET स्कोअरच्या आधारे नोकरीची संधी

  • सरकारी आणि खाजगी क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT