Stock Market Updates
भारतीय शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात घसरणीसह झाली. सोमवारी (दि. १४ जुलै) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांनी घसरून ८२,२०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ७५ अंकांच्या घसरणीसह २५ हजारांवर व्यवहार करत आहे. आयटी आणि फायनान्सियल शेअर्समध्ये कमकुवतपणा दिसून आला आहे.
जागतिक स्तरावर टॅरिफबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आणि भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कमकुवत तिमाही निकालाचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. भारत- अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय ट्रेड डीलला झालेल्या विलंबाचाही बाजारावर दबाव राहिला आहे.
सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरले आहेत. तर दुसरीकडे सन फार्मा, इर्टनल, एम अँड एम, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.
निफ्टी आयटी जवळपास १ टक्के घसरला आहे. LTIMindtree, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो या आयटी कंपन्यांचे शअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत.