Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात जोरदार वाढ; सेंसेक्स 500 अंकांनी वर, निफ्टी 24,400च्या दिशेने, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: जागतिक सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेंसेक्स 500 अंकांनी वाढला, तर निफ्टी 24,400 च्या जवळ पोहोचला.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Today: आज शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. जागतिक पातळीवर सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे भारतीय बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेंसेक्स सुमारे 500 अंकांनी वाढला, तर निफ्टी 140 अंकांनी वाढ घेत 24,400 च्या जवळ पोहोचला.

ग्लोबल संकेतांनी दिला जोर

आज बाजार उघडण्याआधीच जागतिक वातावरण सकारात्मक दिसत होतं. अमेरिका-इराण तणाव कमी होण्याची शक्यता, हॉर्मुज सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा आणि अमेरिकन बाजारातील तेजी, या सगळ्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. GIFT निफ्टीही 125 अंकावर ट्रेड करत होता, ज्यामुळे भारतीय बाजाराची सुरुवात मजबूत होईल हे आधीच स्पष्ट झालं होतं.

युद्ध थांबण्याची आशा, बाजारात उत्साह

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा तणाव कमी होण्याचे संकेत दिले आहेत.
यामुळे जागतिक बाजारात भीती कमी झाली आणि गुंतवणूक वाढली. हॉर्मुज मार्ग खुला राहणार असल्यामुळे तेल पुरवठा सुरळीत राहील, अशी आशा निर्माण झाली आहे.

IT आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी

आजच्या तेजीमध्ये सर्वात मोठा वाटा IT आणि बँकिंग सेक्टरचा होता. गुंतवणूकदारांनी या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे बाजार वर गेला.

अमेरिकन बाजारांचा प्रभाव

अमेरिकेतील Nasdaq आणि S&P 500 यांनी नवे उच्चांक गाठले आहेत. टेक शेअर्समधील तेजीमुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण तयार झालं.

कच्च्या तेलात घसरण

ब्रेंट क्रूड $95 च्या खाली स्थिर झाल्यामुळे महागाईचा दबाव कमी होण्याची शक्यता आहे.
हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत मानले जातं आहेत.

सोन्या-चांदीत घसरण

आज सोन्या आणि चांदीच्या किमतीतही घसरण झाली. याचा अर्थ गुंतवणूकदार सध्या इक्विटी मार्केटकडे वळत आहेत.

FIIs-DIIs आकडे काय सांगतात?

परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) खरेदी केली आहे, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) थोडी विक्री केली आहे. यामुळे बाजारात संतुलन राहिलं आहे. आजचा बाजार पूर्णपणे ग्लोबल संकेतांवर आधारित आहे. जर तणाव कमी राहिला आणि तेलाचे दर स्थिर राहिले, तर बाजारात आणखी वाढ होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT