

Stock Market Today: शेअर बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. आठवड्याच्या सुरुवातीला सुट्टीनंतर उघडलेल्या बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह दिसला. सेन्सेक्स तब्बल 1300 अंकांनी वाढून 78,000 च्या वर गेला, तर निफ्टीने 24,200 चा टप्पा पार केला.
आजच्या तेजीमागे ग्लोबल मार्केटमधील घडामोडींचा मोठा हात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूड जवळपास 5% घसरून $95 च्या आसपास पोहोचलं. यामुळे महागाई कमी होण्याची अपेक्षा वाढली आणि बाजाराला सकारात्मक दिशा मिळाली.
अमेरिकन बाजारातही जोरदार तेजी दिसली. डाओ इंडेक्स दोन दिवसांत सुमारे 600 अंकांनी वाढला, तर नॅस्डॅक सलग दहाव्या दिवशी वाढीसह बंद झाला. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
मिडल ईस्टमधील हॉर्मुज सामुद्रधुनीत तणाव कायम आहे. अमेरिकेने काही प्रमाणात जहाजांच्या हालचालींवर नियंत्रण आणल्याने सप्लायवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात अजूनही अनिश्चितता आहे.
परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा विक्रीचा मार्ग स्वीकारला आहे. FIIs ने सुमारे ₹2000 कोटींची विक्री केली. मात्र, देशांतर्गत गुंतवणूकदार (DIIs) सतत खरेदी करत असल्याने बाजाराला मजबूत आधार मिळतोय.
कमोडिटी मार्केटमध्येही मोठी हालचाल दिसली.
सोने जवळपास ₹2,745 ने वाढून ₹1.55 लाख
चांदी तब्बल ₹12,000 ने वाढून ₹2.52 लाखा झाली
जागतिक अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढत आहे.
IMF ने भारताच्या GDP वाढीचा अंदाज वाढवून 6.5% केला आहे. यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी भारत आकर्षक ठरत आहे.
आजच्या तेजीमध्ये काही शेअर्स विशेष चमकले, यात Hindalco आणि Indigo या शेअर्समध्ये चांगली खरेदी पाहायला मिळाली. आजचा बाजार स्पष्टपणे “बुल मोड”मध्ये दिसतोय. पण ग्लोबल तणाव आणि FIIs विक्रीमुळे सावध राहणंही गरजेचं आहे.