Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराने तेजीसह सुरुवात केली. सुरुवातीला थोडी घसरण झाली असली तरी बाजाराने लगेचच वेग पकडला आणि सर्व इंडेक्स हिरव्या रंगात गेले. सेंसेक्स 230 अंकांनी तर निफ्टी 60 अंकांनी वाढून ट्रेड करत होता. मेटल, ऑइल अँड गॅस आणि बहुतेक सर्व सेक्टोरल इंडेक्समध्ये चांगली वाढ दिसत होती.
सुरुवातीच्या सत्रात सेंसेक्स 84 अंकांनी घसरून 84,503 वर उघडला होता, तर निफ्टी 42 अंकांनी घसरून 25,842 वर उघडला त्यानंतर लगेचच बाजाराने दिशा बदलत जोरदार तेजी दाखवली. बँक निफ्टीही 37 अंकांनी घसरला होता पण पुढे त्यात रिकव्हरी झाली.
अमेरिकन फेडकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याने वॉल स्ट्रीटमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. डाओ 650 अंकांनी, तर नॅस्डॅक 150 अंकांनी वाढून बंद झाला. अमेरिकन बाँड यिल्ड 4% च्या आसपास घसरला, डॉलर इंडेक्स 100 च्या खाली आला आहे. GIFT निफ्टीही 26,150 च्या वर होता आणि चीन वगळता सर्व प्रमुख आशियाई बाजार आज तेजीत होते.
युक्रेनकडून शांतता प्रस्तावावर बहुतेक अटींवर सहमती मिळाल्याच्या बातमीमुळे जागतिक ताणाव कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली. त्यामुळे क्रूडची किंमत 61 डॉलरवर पोहचली. दरम्यान, सोनं ₹1,300 वाढून ₹1,25,100 च्या वर गेलं, तर चांदी ₹1,700 वाढून ₹1,56,200 वर पोहचली आहे.
मंथली एक्सपायरीच्या दिवशी FII ने कॅश मार्केटमध्ये 785 कोटींची खरेदी केली, मात्र इतर मार्केट ऑपरेशन्स मुळे नेट 1,400 कोटींची विक्री झाली. दुसरीकडे DII ने सलग 62व्या दिवशी खरेदी कायम ठेवत तब्बल 3,900 कोटींची गुंतवणूक केली.
Bharti Airtel – 7,100 कोटींची ब्लॉक डील शक्य; प्रमोटर Indian Continent Investment 2,097 रु. फ्लोर प्राइसवर 0.5% हिस्सेदारी विकणार.
Excelsoft Technologies – IPOची आज लिस्टिंग, इश्यू प्राइस ₹120; बोली 43 पट होती.
डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मिळवण्याचे नियम सुलभ करण्यात आले. आता 10 लाखांपर्यंतच्या केसमध्ये फक्त अॅफिडेविट + इंडेम्निटी बॉण्ड पुरेसे आहेत. पूर्वी ही मर्यादा 5 लाख होती.