Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी 100 अंकांनी खाली, India VIX मध्ये मोठी वाढ

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आणि निफ्टी तसेच सेन्सेक्समध्ये घसरण दिसली. India VIX मध्ये 13% वाढ झाली असून बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे.

Rahul Shelke

Stock Market Today: आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक संकेत नकारात्मक असताना आणि गुंतवणूकदारांमध्ये सावध भूमिका दिसत असल्याने बाजारात सुरुवातीपासूनच विक्रीचा दबाव होता.

सेंसेक्स सुमारे 200 अंकांनी खाली आला, तर निफ्टीमध्ये जवळपास 100 अंकांची घसरण झाली. बँक निफ्टीमध्येही 170 अंकांच्या आसपास घसरण दिसली.

बाजारातील अस्थिरता मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याचेच प्रतिबिंब व्होलॅटिलिटी इंडेक्स India VIX मध्ये तब्बल 13% वाढ झाली. VIX वाढणे म्हणजे बाजारातील चिंता वाढल्याचे संकेत आहेत. आज मेटल सेक्टरमध्ये सर्वाधिक विक्री होत असल्याचे चित्र आहे. Hindalco, JSW Steel, Tata Steel यांसारखे स्टॉक्स लाल रंगात होते.

तर दुसरीकडे, ऑटो सेक्टरमध्ये खरेदीचे संकेत दिसले. महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), Eicher Motors, Maruti, TMPV हे शेअर्स निफ्टीवरील टॉप गेनर्समध्ये होते. त्याचबरोबर TCS आणि Titan मध्येही चांगली तेजी पाहायला मिळाली. निफ्टीवरील टॉप लूजर्समध्ये Shriram Finance, ICICI Bank, Tata Consumer आणि Adani Ports यांचा समावेश होता.

सध्या जागतिक आर्थिक डेटा, परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका आणि अमेरिकन बाजारातील हालचाली याचा भारतीय बाजारावर थेट परिणाम दिसत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की अस्थिरता वाढलेली असल्याने गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

देशातील आर्थिक संकेतांमध्ये काही चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात देशातील 8 कोर सेक्टरची वाढ शून्यावर आली असून हा आकडा 14 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आहे. कोळसा, वीज आणि नैसर्गिक वायू उत्पादनात घट झाली आहे.

कॉर्पोरेट घडामोडींच्या बातम्यांकडे पाहता, TCS च्या AI डाटा सेंटर HyperVault मध्ये TPG ने 1 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे टेक सेक्टरमध्ये काही सकारात्मक हालचाल घडू शकते. तर आज AWL Agri Business मध्ये 2,500 कोटींच्या ब्लॉक डीलची शक्यता आहे.

IPO मार्केटमध्येही हालचाल सुरू आहे. Capillary Technologies आज लिस्ट होणार आहे. याला 53 पट प्रतिसाद मिळाला होता. Excelsoft Technologies चा IPO आज बंद होणार असून 7 पट ओव्हरसबस्क्रिप्शन मिळाले आहे.

दरम्यान, RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापार करारामुळे करंट अकाउंट डेफिसिटवर (CAD) होणारा दबाव कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

एकूणच, जागतिक बाजारातील तणाव आणि वाढती अस्थिरता लक्षात घेता गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT