Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 83,877 च्या जवळ, आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री

Stock Market Today: कालच्या जोरदार तेजी नंतर आज बाजारात प्रॉफिट बुकिंग झाली आणि IT शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. NIFTY 50 25,780 च्या आसपास तर BSE Sensex मर्यादित वाढीसह व्यवहारात होता.

Rahul Shelke

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात वाढीसह झाली. काल झालेल्या मोठ्या तेजीचा परिणाम आज सकाळी दिसून आला. व्यवहार सुरू होताच BSE Sensex सुमारे 120 अंकांनी वाढला, तर NIFTY 50 जवळपास 61 अंकांनी वाढला. मात्र खालच्या स्तरावरून थोडी खरेदी झाल्याने बाजारात रिकव्हरी पाहायला मिळाली.

सकाळी साडेनऊच्या सुमारास सेन्सेक्स सुमारे 80 अंकांच्या वाढीसह 83,800 च्या आसपास ट्रेड करत होता, तर निफ्टी 32 अंकांनी वधारत 25,765 जवळ होता. बँक निफ्टीतही सुमारे 200 अंकांची तेजी दिसून आली.

IT शेअर्समध्ये जोरदार विक्री

आजच्या सत्रात सर्वाधिक दबाव IT सेक्टरवर झाला. IT निर्देशांक सुरुवातीलाच 5 टक्क्यांहून अधिक घसरला. Infosys, Tata Consultancy Services, HCL Technologies, Wipro आणि Tech Mahindra या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मीडिया, रियल्टी आणि मिड-स्मॉल हेल्थकेअर शेअर्समध्येही विक्रीचा दबाव होता. मात्र ऑटो, मेटल, FMCG, ऑयल अँड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये खरेदी दिसून आली.

अमेरिका-भारत ट्रेड डीलवर सकारात्मक संकेत

बाजारासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे अमेरिका-भारत व्यापार करार. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी पुढील दोन ते तीन दिवसांत भारत-अमेरिका ट्रेड डील साइन होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. या कराराचा फायदा शेतकरी, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाला होण्याची शक्यता असून, त्यामुळे अ‍ॅग्री आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये हालचाल वाढू शकते.

परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी

आज बाजाराला आधार देणारा मोठा घटक म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी. FIIs नी कॅश मार्केटमध्ये सुमारे 5,200 कोटी रुपयांची खरेदी केली असून, ही गेल्या तीन महिन्यांतील सर्वात मोठी खरेदी मानली जाते. डेरिव्हेटिव्हसह एकूण गुंतवणूक 16,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनीही सुमारे 1,000 कोटींची खरेदी केली.

अमेरिकन बाजार कमकुवत

मंगळवारी अमेरिकन बाजारात टेक शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. नॅस्डॅक सुमारे 350 अंकांनी घसरला, तर डाओ जोन्सही दिवसाच्या उच्चांकावरून खाली येत नकारात्मक बंद झाला. याचा परिणाम आज आशियाई बाजारांवरही दिसून आला.

सोने-चांदीत मोठी वाढ

कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीने ऐतिहासिक झेप घेतली आहे. देशांतर्गत बाजारात सोने सुमारे 10,000 रुपयांनी वाढून 1.54 लाखांच्या जवळ पोहोचले, तर चांदी 32,000 रुपयांनी वाढून 2.68 लाखांच्या पुढे गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातही गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये जोरदार तेजी आहे. डॉलर कमकुवत झाल्यामुळे बेस मेटल्समध्येही चमक दिसली. कॉपर, अ‍ॅल्युमिनियम आणि निकेलमध्ये वाढ झाली, तर कच्चे तेल जवळपास 2 टक्क्यांनी वाढले.

RBIच्या धोरण बैठकीकडे लक्ष

आजपासून Reserve Bank of India ची तीन दिवसांची मौद्रिक धोरण बैठक सुरू होत आहे. बाजाराला यावेळी लिक्विडिटी वाढवण्याबाबत संकेत मिळण्याची अपेक्षा आहे. RBI चा निर्णय बँकिंग आणि फायनान्शियल शेअर्ससाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT