Stock Market Crash Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स 316 अंकांनी खाली, कोणते शेअर्स घसरले?

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने आज लाल रंगात सुरुवात केली असून निफ्टी 87 अंकांनी खाली तर सेन्सेक्स 316 अंकांनी घसरला. डॉलरसमोर रुपया 89.97च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेला आहे.

Rahul Shelke

Stock Market Today: आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग दिवशी देशांतर्गत शेअर बाजार लाल रंगात उघडला. वीकली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी सुरुवातीलाच 87 अंकांच्या घसरणीसह 26,088वर उघडला, तर सेन्सेक्स 316 अंकांनी कोसळत 85,325 वर उघडला.

सलग दोन दिवशी बाजार लाल रंगात बंद होत असल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, सोमवारी निफ्टीने 26,325चा लाइफ-हाय गाठला होता. आज रुपया डॉलरसमोर 89.97 या नवीन ऐतिहासिक नीचांकी स्तरावर घसरला असून कधीही 90च्या खाली जाण्याची शक्यता आहे.

घसर असूनही सेन्सेक्समध्ये किरकोळ सुधारणा

बातमी लिहेपर्यंत सेन्सेक्स 85,500च्या आसपास किरकोळ घसरणीसह ट्रेड करत होता. टॉप-30 स्टॉक्सपैकी 15 शेअर्स हिरव्या तर 15 लाल रंगात होते. एशियन पेंट्स, भारती एअरटेल आणि इन्फोसिस हे शेअर्स गेनर्स ठरले, तर HDFC बँक, ICICI बँक, अॅक्सिस बँक आणि बजाज फिनसर्व्ह शेअर्स लूजर्स होते.

बाजारावर परिणाम करणारे प्रमुख घटक

या आठवड्यात बाजारावर काही महत्त्वाच्या घटकांचा परिणाम होणार आहेत. या आठवड्यात RBI आणि पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्हची मॉनेटरी पॉलिसी जाहीर होणार आहे. दोन्ही ठिकाणांहून व्याजदर कपातीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचबरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांतील धोरणात्मक चर्चेकडे बाजाराचे लक्ष आहे.

या महिन्यात तब्बल 30,000 कोटी रुपयांचे 25 IPO येणार असून त्याचा लिक्विडिटीवर थेट परिणाम होणार आहे. दुसरीकडे, डॉलरसमोर रुपया सतत घसरत आहे. परदेशी गुंतवणूकदारांची (FIIs) अनियमित विक्री आणि ग्लोबल क्रिप्टो मार्केटमधील दबावाचा परिणाम भारतीय इक्विटी मार्केटवर होत आहे.

टेक्निकल आउटलुक काय आहे?

टेक्निकल आउटलुकनुसार निफ्टीसाठी 26,100–26,000 ही रेंज अत्यंत महत्त्वाचा सपोर्ट झोन मानली जात आहे. या लेव्हलवर मजबूत खरेदी दिसल्यास बाजार पुन्हा उभारी घेऊ शकतो. मात्र, डॉलर इंडेक्स मजबूत राहिला आणि रुपया कोसळत राहिला, तर बाजारातील घसरण आणखी वाढू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT