Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 25,850 जवळ, ऑटो-रिअल्टी शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजार उघडताच निफ्टी वाढीसह 25,850 च्या जवळ पोहोचला, तर सेंसेक्सही तेजीत होता. ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रात खरेदीचा ओघ वाढलेला दिसला.

Rahul Shelke

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजार उघडताच निफ्टी वाढीसह 25,850 च्या जवळ पोहोचला, तर सेंसेक्सही तेजीत होता. ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रात खरेदीचा ओघ वाढलेला दिसला, तर मीडिया इंडेक्स सोडून बहुतेक सर्व सेक्टर्स हिरव्या रंगात ट्रेड करत होते.

निफ्टी 50 मध्ये Hindalco, Adani Ports, Bajaj Finserv, M&M, Trent, Kotak Bank आणि Tata Steel हे टॉप गेनर्स ठरले. दुसरीकडे Indigo मध्ये तब्बल 1.7% घसरण झाली आणि तो सर्वाधिक घसरणारा शेअर ठरला. SBI Life, Titan, Bharti Airtel, HDFC Life आणि Tata Consumer मध्येही घसरण दिसून आली.

कालच्या क्लोजिंगच्या तुलनेत सेंसेक्स आज 59 अंकांनी वाढून 84,607 वर उघडला. निफ्टी 25 अंकांनी वाढून 25,864 वर आणि बँक निफ्टी 59 अंकांनी वाढून 59,281 वर उघडला. चलन बाजारात रुपया डॉलरसमोर 90.03 वर घसरला.

शेअर बाजारात आज जागतिक संकेत, कमोडिटी मार्केटचा कल, मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक आणि IPOचा प्रभाव दिसत आहे. फेडरल रिझर्व्हच्या धोरणापूर्वी जागतिक बाजार मिश्र अवस्थेत होते. देशांतर्गत पातळीवर FII ची जोरदार विक्री सुरू असून DII सलग 72 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. अनेक IPO लिस्टिंग्स आणि कॉर्पोरेट अपडेट्समुळेही आज बाजारात चांगलाच उत्साह दिसत आहे.

भारत-अमेरिका ट्रेड डील

अमेरिकेचे प्रतिनिधीमंडळ ट्रेड डीलबाबत चर्चा करण्यासाठी भारतात आले आहे. 10 ते 12 डिसेंबरदरम्यान बैठक होणार असून व्यापार आणि गुंतवणुकी संदर्भात महत्त्वाच्या चर्चा अपेक्षित आहेत.

सोने-चांदीची जबरदस्त तेजी

देशांतर्गत बाजारात चांदीत तब्बल ₹6,300 ची वाढ होऊन ₹1,88,665चा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 5% वाढून पहिल्यांदाच $61 च्या वर गेली. सोने ₹200 वाढून ₹1,29,900 च्या जवळ पोहोचले.

अमेरिकन बाजारात अस्थिरता; फेडकडे नजर

फेड पॉलिसीपूर्वी वॉल स्ट्रीटमध्ये प्रचंड चढ-उतार दिसले. डाओ निर्देशांक दिवसभरातील उच्चांकावरून 400 अंकांनी घसरून बंद झाला. नॅस्डॅकने मात्र जोरदार रिकव्हरी करत 30 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT