Stock Market Opening Updates
भारतीय शेअर बाजाराने बुधवारी (दि.११ जून) हिरव्या रंगात सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी वाढून ८२,५०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३० अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,१३० वर व्यवहार करत आहे.
सेक्टर्समधील निफ्टी बँक, एफएमसीजी, फायनान्सियल सर्व्हिसेस, आयटी निर्देशांक घसरले आहेत. तर निफ्टी ऑटो ०.८ टक्के वाढला आहे. मेटल, रियल्टी हे निर्देशांकही वाढून खुले झाले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांत तेजी कायम आहे.
सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर्स १.६ टक्के वाढून टॉप गेनर ठरला आहे. त्याचबरोबर एम अँड एम, इर्टनल, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, इन्फोसिस हे शेअर्सही तेजीत खुले झाले आहेत. तर कोटक बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, एसबीआय हे शेअर्स घसरले आहेत.
अमेरिका आणि त्यांचे प्रमुख भागीदारी देश भारत, चीन यांच्यामधील द्विपक्षीय व्यापार चर्चा पुढे जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आज आशियाई बाजारांत तेजी दिसून आली. याचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनीही तेजीत सुरुवात केली आहे.