Stock Market Updates
जागतिक नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२ जून) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (BSE Sensex) ७०० हून अधिक अंकानी घसरून ८०,७५०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty50) २०० अंकांनी घसरून ५५० वर व्यवहार करत आहे.
अमेरिका आणि चीन व्यापार तणावामुळेही बाजारात गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून येत आहे.
आयटी आणि फायनान्सियल शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली. निफ्टी आयटी (Nifty IT) १.१ टक्के घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर व्यवहार करत आहेत.
सेन्सेक्सवर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, रिलायन्स, मारुती, टायटन, एलटी, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस हे शेअर्स १ ते १.७ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर दुसरीकडे अदानी पोर्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.
अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि अमेरिकेच्या रोजगार आकडेवारीपूर्वी आशियाई बाजारात दबावाचे वातावरण आहे. जपानचा निक्केई १.४ टक्के घसरला आहे. तर हाँगकाँगचा हँगसेंग २.५ टक्के खाली आला आहे.