Stock Market Opening Updates
जागतिक सकारात्मक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजाराने बुधवारी (४ जून) तेजीत सुरुवात केली. सेन्सेक्स १५० अंकांनी वाढून ८०,८८० वर खुला झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ५० हून अधिक अंकांच्या वाढीसह २४,६०० जवळ व्यवहार करत आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात खुले झाले आहेत. गेले तीन दिवस बाजारात घसरण दिसून आली होती.
सेन्सेक्सवर भारती एअरटेल, टाटा मोटर्स, इटर्नटल, एम अँड एम, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा हे शेअर्स ०.५ ते १ टक्के वाढले आहेत. तर दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, टायटन, सन फार्मा हे शेअर्स घसरले आहेत.
क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी ऑटो, एफएमसीजी, आयटी हे वाढले आहेत. व्होडाफोन आयडियाचा शेअर्स १.५ टक्के घसरला आहे. एरिक्सन इंडियाने कंपनीतील त्यांचा काही उर्वरित बल्क डीलमध्ये विकल्यानंतर व्होडाफोन आयडियाचा शेअर्स घसरला असल्याचे दिसून आले आहे.
अमेरिकेतील शेअर बाजार मंगळवारी चौथ्या दिवशी वाढून बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रिय ॲव्हरेज निर्देशांकाने २०० हून अधिक अंकांची वाढ नोंदवली. तर नॅस्डॅक सुमारे १५० अंकांच्या वाढीसह स्थिरावला. आज सकाळी आशियाई बाजारांवरही त्याचा प्रभाव दिसून आला. आशियाई बाजारात तेजी राहिली आहे.
भारतीय शेअर बाजार मंगळवारी (दि.३ जून) घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्स (Sensex) ६३६ अंकांनी घसरून ८०,७३७ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty 50) १७४ अंकांच्या घसरणीसह २४,५४२ वर स्थिरावला होता. या घसरणीतून सावरत बाजारात रिकव्हरी दिसून आली आहे.