Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 430 अंकांनी कोसळला, निफ्टी 25,400 च्या खाली

Stock Market News: भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 430 अंकांनी तर निफ्टी 140 अंकांनी घसरून 25,400 च्या खाली आला. IT, रिअल्टी आणि बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

Rahul Shelke

Stock Market News: भारतीय शेअर बाजाराने आज (शुक्रवार, 7 नोव्हेंबर) दिवसाची सुरुवात मोठ्या घसरणीसह केली आहे. जागतिक संकेत आणि देशांतर्गत आर्थिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स तब्बल 430 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 140 अंकांनी घसरून 25,400 च्या खाली गेला. बँक निफ्टीतही सुमारे 200 अंकांची घसरण झाली आहे.

सकाळच्या सत्रात जवळपास सर्वच सेक्टर्समध्ये घसरण दिसून आली. IT, रिअल्टी, ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्स, PSU आणि प्रायव्हेट बँक शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली.

शेअर बाजारातील सुरुवातीचे आकडे

  • सेन्सेक्स : 161 अंकांनी खाली 83,150 वर उघडला

  • निफ्टी : 76 अंकांनी खाली 25,433 वर उघडला

  • बँक निफ्टी : 163 अंकांनी घसरून 57,391 वर

  • रुपया : 5 पैशांच्या घसरणीसह ₹88.66/$ वर उघडला

गिफ्ट निफ्टी सकाळी 130 अंकांनी खाली होता. अमेरिकन बाजारातील घसरण, FII ची सततची विक्री आणि कच्च्या तेलातील घसरण या घटकांचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.

जागतिक बाजाराचे संकेत

अमेरिकन बाजारात AI शेअर्समधील प्रचंड विक्रीमुळे वॉल स्ट्रीट मोठ्या प्रमाणात घसरला.

  • डाऊ जोन्स : 398 अंकांनी कोसळला

  • नॅस्डॅक : 445 अंकांनी घसरला

  • S&P 500 : लाल रंगात बंद

याचा परिणाम म्हणून आज आशियाई बाजारातही घसरण दिसून आली.

कमॉडिटी मार्केटमध्ये सुस्ती

कच्चे तेल $64 प्रति बॅरलच्या खाली गेले असून ही अलीकडील महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळी आहे. सोने-चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिर आहेत. भारतात सोने ₹1,20,700 आणि चांदी ₹1,47,300 च्या आसपास बंद झाली.

ट्रम्प यांच्या विधानामुळे डिप्लोमॅटिक चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की ते पुढील वर्षी भारत भेटीवर येऊ शकतात. त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ट्रेड डीलवर "चांगली चर्चा" सुरू आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

FIIची विक्री कायम, DIIची खरेदी सुरूच

परकीय गुंतवणूकदारांनी (FII) सलग सहाव्या दिवशी विक्री केली असून काल त्यांनी सुमारे ₹4,021 कोटींचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) सलग 49 व्या दिवशी खरेदी सुरू ठेवली आणि जवळपास ₹5,300 कोटींची गुंतवणूक केली.

सरकारचा मोठा खुलासा; F&O ट्रेडिंगवर बंदी नाही

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं की सरकारचा F&O ट्रेडिंग बंद करण्याचा कोणताही विचार नाही. त्यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला की, “जोखीम विचारात घेऊनच ट्रेड करा.” या वक्तव्यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कंपन्यांचे तिमाही निकाल

  • चांगले निकाल: Apollo Hospitals, Lupin, Cummins, MCX आणि LIC

  • कमकुवत निकाल: NHPC, CG Consumer आणि Amber

  • संमिश्र निकाल: ABB आणि Mankind Pharma

आज Bajaj Auto, Hindalco आणि Trent या कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत. F&O सेगमेंटमध्ये Divi’s Lab, Kalyan Jewellers, NALCO, Nykaa आणि Torrent Pharma यांच्याकडेही बाजाराचे लक्ष असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT