Stock Market Closing Updates
देशातील महागाईत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील चार सत्रांतील घसरणीला मंगळवारी (दि. १५ जुलै) ब्रेक लागला. सेन्सेक्स ३१७ अंकांनी वाढून ८२,५७० वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ११३ अंकांच्या वाढीसह २५,१९५ वर स्थिरावला. विशेषतः ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज २.७३ लाख कोटींनी वाढून ४६०.३७ लाख कोटींवर पोहोचले. १४ जुलै रोजी ते ४५७.३७ लाख कोटींवर होते.
सेन्सेक्सवरील ३० पैकी २२ शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. यात सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, ट्रेंट, एम अँड एम, बजाज फायनान्स या शेअर्सचा समावेश होता.
सेक्टरलमध्ये निफ्टी ऑटो १.५ टक्के वाढला. ऑटोमध्ये हिरो मोटोकॉर्प ४.९ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. टीव्हीएस मोटर्स २.८ टक्के, बजाज ऑटो २.८ टक्के वाढला.
निफ्टी फार्मा निर्देशांक १.१ टक्के वधारुन बंद झाला. फार्मामध्ये नॅटको फार्मा, बायोकॉन, सन फार्मा, Ajanta Pharma हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले. बीएसई मिडकॅप ०.८ टक्के आणि आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.९ टक्के वाढला. या दोन्ही निर्देशांकांनी सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवली.
येस बँकेचा शेअर्स २.४ टक्के वाढला. तर दुसरीकडे आयटीमध्ये एचसीएल टेकचा ३.२ टक्के घसरला. निफ्टी ५० वर या शेअर्सची सर्वात खराब कामगिरी राहिली. कंपनीच्या अपेक्षेपेक्षा कमी तिमाही कमाईच्या पार्श्वभूमीवर हा शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
जूनमध्ये देशातील वार्षिक किरकोळ महागाई दर २.१० टक्क्यांवर आला. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई दर खाली आला आहे. यामुळे संभाव्य व्याजदर कपातीच्या आशा वाढल्या आहेत. याचे सकारात्मक पडसाद बाजारात दिसून आले.