भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी (दि.२३ मे) तेजीत व्यवहार केला.  (AI Image)
अर्थभान

Stock Market Closing | तेजीचा माहौल! सेन्सेक्स ७६९ अंकांनी वाढून बंद, 'हे' शेअर्स चमकले

सेन्सेक्स- निफ्टी जवळपास १-१ टक्के वाढले, जाणून घ्या बाजारात आज काय घडलं?

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Closing Updates

आशियाई बाजारातून सकारात्मक संकेत आणि अमेरिकेच्या ट्रेझरी यिल्डमध्ये घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (दि.२३ मे) तेजीचा माहौल राहिला. सेन्सेक्स ७६९ अंकांनी वाढून (०.९५ टक्के वाढ) ८१,७२१ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २४३ अंकांच्या वाढीसह (०.९९ टक्के वाढ) २४,८५३ वर स्थिरावला. आजच्या सत्रात एफएमसीजी शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी राहिली.

सेक्टरल फ्रंटवर निफ्टी एफएमसीजी (Nifty FMCG) टॉप गेनर निर्देशांक ठरला. हा निर्देशांक १.६ टक्के वाढला. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.१ टक्के आणि निफ्टी बँक १ टक्के वाढला. निफ्टी आयटी ०.९ टक्के वाढला. तर निफ्टी फार्मा निर्देशांक ०.४ टक्के घसरून बंद झाला.

गुंतवणूकदारांनी कमावले २.९० लाख कोटी

दरम्यान, आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी २.९० लाख कोटींची कमाई केली. आज २३ मे रोजी बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४४१.८८ लाख कोटी रुपयांवर गेले. ते २२ मे रोजी ४३८.९८ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज बाजार भांडवलात २.९० लाख कोटींची वाढ झाली.

Sensex Today Updates | 'हे' शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर इर्टनलचा शेअर्स ३.६ टक्के वाढला. पॉवरग्रिड, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, कोटक बँक, एलटी, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स हे शेअर्स १ ते२.५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे सन फार्माचा एकमेव शेअर्स २.१ टक्के घसरला.

जागतिक बाजारातील स्थिती काय?

तीस वर्षांच्या अमेरिकन बाँड यिल्डने १९ महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली होती. त्यानंतर गुरुवारी ते कमी झाले. यामुळे व्याजदराच्या दबावाबाबत चिंता कमी झाली. याचे सकारात्मक पडसाद आशियाई बाजारात दिसून आले. आशियाई बाजारात आज तेजी राहिली.

जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.४ टक्के वाढला. हाँगकाँगचा हँगसेंग ०.२ टक्केवाढीसह बंद झाला. दरम्यान, अमेरिकेतील वाढत्या वित्तीय तुटीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील शेअर बाजारातील तिन्ही निर्देशांक गुरुवारी सपाट पातळीवर बंद झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT