Stock market closing bell Pudhari
अर्थभान

Stock market closing bell | शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स 256 अंकांनी तर निफ्टीमध्ये 100 अंकांची वाढ

Stock market closing bell | कोटक महिंद्रा बँक आणि जिओ फायनान्सच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ

Akshay Nirmale

Stock market closing bell 9th June 2025

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी 9 जून 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 256 अंकांनी वाढत 82445 या उच्च स्तरावर बंद झाला, तर निफ्टी 100 अंकांनी वधारत 25103 वर बंद झाला.

यामध्ये बँकिंग, फायनान्स, ऊर्जा आणि IT क्षेत्रातील शेअर्सनी मोठी कामगिरी केली. कोटक महिंद्रा बँक आणि जिओ फायनान्सचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले.

सेन्सेक्समधील कामगिरी

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 23 शेअर्सनी सकारात्मक कामगिरी केली, तर फक्त 7 शेअर्स घसरणीसह बंद झाले. कोटक बँक, जिओ फायनान्स, रिलायन्स, HDFC बँक आणि TCS सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी बाजाराला वर नेण्यास हातभार लावला.

सुरुवातीच्‍या व्‍यवहारात सेन्सेक्स ४०० पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह 82600 वर पोहचला होता.

ग्लोबल मार्केटमधील उत्साह

जगभरातील शेअर बाजारातही तेजीचा सूर होता.

  • जपानचा निक्केई निर्देशांक 0.92% वाढून 38,088 वर बंद झाला.

  • दक्षिण कोरियाचा कोस्पी 1.55% वाढून 2,855 वर पोहोचला.

  • हॉन्गकॉन्गचा हँगसेंग 1.63% वधारून 24,181 वर बंद झाला.

  • चीनचा शांघाय कंपोझिट 0.43% वाढून 3,399 वर बंद झाला.

मागील आठवड्यातील घडामोडी

2 ते 6 जून दरम्यानच्या आठवड्यात भारतीय बाजारात सुरुवातीला थोडी घसरण झाली होती. मात्र, शेवटच्या दोन दिवसांत जोरदार रिकव्हरी झाली. संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स 737 अंकांनी आणि निफ्टी 252 अंकांनी वधारले.

6 जून रोजी, RBI ने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे बाजारात उत्साह संचारला. रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची कपात तर CRR मध्ये 100 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यामुळे विशेषतः रिअल्टी, बँकिंग आणि ऑटो सेक्टरमध्ये खरेदी दिसून आली.

6 जून रोजीच सेन्सेक्स 747 अंकांनी वाढून 82,189 वर बंद झाला होता आणि निफ्टीनेही 252 अंकांची भर घालत 25,003 गाठला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT