Who is Anand Varadarajan: स्टारबक्सने (Starbucks) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून आनंद वरदराजन यांची नियुक्ती केली आहे. ते 19 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ब्रायन निकोल यांच्या नेतृत्वाखाली स्टारबक्स सध्या स्टोअर्समध्ये तांत्रिक बदल करत आहे. काम अधिक जलद, सोपं आणि कर्मचारी-केंद्रित व्हावं, हा या बदलांचा मुख्य उद्देश आहे.
आनंद वरदराजन हे याआधी Amazon मध्ये तब्बल 19 वर्षे कार्यरत होते. अॅमेझॉनमध्ये त्यांनी जागतिक पातळीवरील किराणा (ग्रोसरी) व्यवसायासाठी तंत्रज्ञान आणि सप्लाय चेन ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळली आहे. याआधी त्यांनी Oracle या सॉफ्टवेअर कंपनीतही काम केले असून, मोठी तंत्रज्ञान प्रणाली हाताळण्याचा त्यांना अनुभव आहे.
स्टारबक्समध्ये ते Executive Vice President आणि CTO म्हणून काम पाहणार असून, थेट CEO कडे रिपोर्ट करणार आहेत. कंपनीच्या तंत्रज्ञान विभागाचं नेतृत्व करण्याबरोबरच ते स्टारबक्सच्या Executive Leadership Team चा भाग असतील. स्टोअरमधील ऑर्डर प्रक्रिया, कर्मचाऱ्यांचे काम आणि एकूण ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
आनंद वरदराजन यांनी University of Washington येथून संगणकशास्त्रात (Computer Science) पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच Purdue University येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स केले आहे. त्यांचे पदवी शिक्षण Indian Institute of Technology मधून झाले आहे.
जगभरातील नामांकित मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणं हे त्यांचं स्वप्न आहे. ते स्वतः कॉफीप्रेमी आहेत आणि दिवसाची सुरुवात साध्या लाटे किंवा ब्रूड कॉफीने करतात. अशा अनुभवी आणि तंत्रज्ञानात पारंगत अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे स्टारबक्सच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.