Silver Price India Future Prediction: 2025 हे वर्ष चांदीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. न्यूयॉर्कपासून दिल्लीपर्यंत चांदीच्या भावाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जागतिक बाजारात चांदीने 102% रिटर्न दिला आहे, तर भारतीय वायदा बाजारात चांदीने 108% पेक्षाही जास्त रिटर्न दिला आहे. देशात एमसीएक्सवर चांदीचा भाव तब्बल ₹1.81 लाख प्रति किलोच्या पुढे गेला आहे. या वाढीने 46 वर्षांचा विक्रम धुळीस मिळवला असून गुंतवणूकदार आता एकच प्रश्न विचारत आहेत, चांदीचा भाव खरंच ₹2 लाखांपर्यंत जाईल का?
1979 नंतर प्रथमच चांदीने जगभरात इतकी धडाकेबाज वाढ केली आहे. 2025 मध्ये चांदी 102% ने वाढली. जागतिक बाजारात चांदी $58.83 प्रति औंसच्या ऑल-टाईम हायवर गेली. त्यानंतर किंचित घसरण झाली आणि भाव $57.42 वर आले, तरीही विश्लेषकांचा अंदाज आहे की येत्या काही महिन्यांत चांदी $59 किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकते. चांदीने यापूर्वीही सोन्यापेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. 2008 ते 2011 दरम्यान चांदीत तब्बल 431% वाढ झाली होती.
भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही चांदीने गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. 2024 च्या शेवटच्या दिवशी चांदीचा भाव होता ₹87,233 प्रति किलो. 2025 मध्ये हा भाव वाढून ₹1,81,601 प्रती किलोवर गेला. म्हणजेच ₹94,368 प्रति किलोची वाढ झाली. इतकी तेजी भारतीय बाजारात अनेक वर्षानंतर पाहायला मिळाली.
चांदीच्या तुफानी वाढीमागे दोन मुख्य कारणे आहेत—
• सौरऊर्जा क्षेत्रात चांदीचा वापर झपाट्याने वाढतो आहे.
• 2024 मध्ये सोलर सेक्टरमध्येच 243.7 मिलियन औंस चांदीचा वापर झाला, जो 2020 च्या तुलनेत 158% जास्त आहे.
• 2030 पर्यंत सोलर सेक्टरमध्ये चांदीची वार्षिक मागणी 150 मिलियन औंसने वाढू शकते.
चांदीच्या खाणी वाढत नाहीत, पण मागणी सातत्याने वाढत आहे, त्यामुळे 'सप्लाय-डिमांड गॅप' प्रचंड वाढला आहे.याशिवाय—
• फेडरल रिझर्व्ह व्याजदरांमध्ये कपातीचे संकेत देत आहे.
• गुंतवणूकदारांचा ETFs मध्ये मोठा इनफ्लो
• जागतिक आर्थिक अनिश्चिततेत सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीला वाढती मागणी
या सर्व कारणांमुळे चांदीचे भाव वाढत आहेत.
तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे की, चांदी 2 लाखांचा टप्पा गाठू शकते.
• या महिन्यातच मार्च कॉन्ट्रॅक्ट ₹1,85,000 ते ₹1,90,000 गाठू शकतात.
• 2026 च्या पहिल्या तिमाहीत चांदी ₹2,00,000 प्रति किलो पार करू शकते.
• ETF मागणीत वाढ, सौरऊर्जा क्षेत्रातील विस्तार आणि अमेरिकन व्याजदर कपात या प्रमुख कारणांमुळे चांदीमध्ये आणखी वाढ होईल.
या 'वेल्थ ग्लोबल रिसर्च'चे डायरेक्टर अनुज गुप्ता म्हणतात, फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये चांदी ₹2 लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
• दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांदी उत्तम पर्याय ठरू शकते
• मात्र, सध्याच्या परिस्थितीत SIP मध्येच गुंतवणूक करावी
• ETF, सिल्वर फ्युचर्स किंवा पेपर सिल्वर अधिक सुरक्षित पर्याय आहेत
• जास्त जोखीम घेऊन मोठी गुंतवणूक करू नये