अर्थभान

Stock Market Closing Bell | शेअर बाजारात चढ-उताराचा खेळ, सेन्सेक्स- निफ्टी सपाट

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी भारतीय शेअर बाजारात अस्थिरता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात बुधवारी (दि.१५) चढ-उतार दिसून आला. तीन दिवसांच्या तेजीनंतर आज सेन्सेक्स, निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ११७ अंकांनी घसरून ७२,९८७ वर बंद झाला. तर निफ्टी १७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २२,२०० वर स्थिरावला. बीएसई मिडकॅप ०.६ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप ०.९ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

बाजारातील ठळक घडामोडी

  • मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांकात सलग चौथ्या सत्रांत तेजी
  • सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेचा शेअर्स १.५ टक्क्यांनी घसरला
  • निफ्टीवर सिप्ला आणि कोल इंडिया यांचे शेअर्स ३ आणि ४ टक्क्यांनी वाढले

शेअर बाजाराने आज तेजीत सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्यात काही प्रमाणात घसरण झाली. क्षेत्रीय पातळीवर निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक १.४ टक्क्याने, तर निफ्टी रियल्टी, ऑईल आणि गॅस दोन्ही १ टक्क्यानी वाढले. निफ्टी एफएमसीजी निर्देशांक १ टक्क्याने खाली आला. निफ्टी ऑटो ०.५ टक्क्यांनी घसरला. निफ्टी बँक आणि निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक प्रत्येकी ०.३ टक्क्यांनी घसरले.

कोणते शेअर्स टॉप गेनर्स, टॉप लूजर्स?

सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया हे शेअर्स घसरले. तर भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एम अँड एम, एलटी, एचसीएल टेक या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

sensex closing

निफ्टीवर आयशर मोटर्स, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, ब्रिटानिया हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर सिप्ला, कोल इंडिया, बीपीसीएल, भारती एअरटेल, एनटीपीसी टेक हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले.

एम अँड एम, स्पाईसजेट तेजीत

सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स १.५ टक्क्यांनी वाढून २,३०५ रुपयांवर पोहोचला. हा या शेअर्सचा सर्वकालीन उच्चांक आहे. तसेच स्पाईसजेट लिमिटेडच्या शेअर्समध्ये बुधवारी सलग चौथ्या सत्रात वाढ दिसून आली. बीएसईवर या शेअर्सने ५ टक्क्यांनी वाढ नोंदवून ६० रुपयांचा दिवसाचा उच्चांक गाठला. स्पाईसजेटने नुकतीच ३१ मे २०२४ पासून दिल्ली आणि फुकेतला जोडणारी दैनंदिन नॉन-स्टॉप विमान सेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते.

परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर जोर

मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्री अधिक राहिली आहे. मे महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण ३३,५४० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांचा खरेदीवर भर राहिला आहे. देशांतर्गंत गुंतवणूकदारांनी (DII) आतापर्यंत २६,५०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजारात काहीशी अस्थिर परिस्थिती राहिली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT