SBI cuts MCLR rates  (File photo)
अर्थभान

SBI cuts MCLR rates | एसबीआयनं स्वातंत्र्यदिनी कोट्यवधी ग्राहकांना दिली खुशखबर! तुमच्या गृहकर्जाचा EMI कमी होणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना स्वांतत्र्यदिनी मोठा दिलासा दिला आहे

दीपक दि. भांदिगरे

SBI cuts MCLR rates

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना स्वांतत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) दिलासा दिला आहे. एसबीआयने गृहकर्ज आणि कारशी संबंधित कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. यामुळे तुमच्या जुन्या गृहकर्जाचा ईएमआय (EMI) अथवा त्याचा कालावधी कमी होऊ शकतो. तसेच या निर्णयामुळे नवीन गृहकर्ज घेणे आधीपेक्षा स्वस्त होईल. ज्यांनी फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतले आहे अशा एसबीआय ग्राहकांना याचा फायदा होईल.

SBI MCLR १५ ऑगस्टपासून लागू

फ्लोटिंग रेट कर्जाचा व्याजदर हा रेपो रेटशी जोडलेला असतो. एसबीआयने विविध मुदतीसाठी निधी आधारित कर्जदर (MCLR) ५ बेसिस पॉइंट्स (bps) ने कमी केला आहे. हा सुधारित दर १५ ऑगस्टपासून लागू आहे.

विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑगस्टमधील पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात कोणताही बदल केला नाही. तो जैसे थे ठेवला. तरीही एसबीआयने MCLR कमी केला आहे. या बदलानंतर हा दर ७.९० टक्के आणि ८.८५ टक्क्यांच्या श्रेणीत राहील. याआधी तो ७.९५ टक्के आणि ८.९० टक्के दरम्यान होता. एमसीएलआर दर कमी झाल्याने त्याच्याशी जोडलेली कर्जे स्वस्त होतील.

Over night आणि एक महिन्याचा एमसीएलआर आता ७.९० टक्के असेल. तो याआधी ७.९५ टक्के होता. ३ महिन्यांचा MCLR ८.३० टक्के, ६ महिन्यांचा ८.६५ टक्के, १ वर्षाचा ८.७५ टक्के, २ वर्षाचा ८.८० टक्के आणि ३ वर्षाचा एमसीएलआर ८.८५ टक्के करण्यात आला आहे.

एमसीएलआर म्हणजे काय?

एमसीएलआर (marginal cost of funds-based lending rate) हा बँक कर्ज व्याजदराच्या गणनेसाठी वारपरला जातो. यामुळे जी MCLR शी जोडलेले कर्जे आहेत त्यांच्या मासिक हप्त्यांमध्ये दर बदल दिसून येऊ शकतो. MCLR मध्ये वाढ झाली तर विविध कालावधीतील कर्जांवर परिणाम होतो. यामुळे कर्ज घेण्याच्या खर्चातही वाढ होऊ शकते. तर एमसीएलआर दरात घट झाल्याने त्याच्याशी जोडलेली कर्जे स्वस्त होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT