भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा. (source- PTI)
अर्थभान

Repo Rate : कर्ज होणार स्वस्त; RBI कडून रेपो दरात कपात

गृहकर्जाचा भार कमी होण्‍यास मदत, FD वरील व्याज देखील घटणार

पुढारी वृत्तसेवा

RBI Cuts Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने (एमपीसीने ) धोरण आढाव्यात रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आज (दि. ६ जून) आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. एमपीसीने लिक्विडिटी ॲडजस्टमेंट सुविधेअंतर्गत पॉलिसी रेपो रेट हे तात्काळ लागू होईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, एकीकडे, दर कपातीमुळे सामान्य लोकांवरील गृहकर्जाचा भार कमी होईल तर दुसरीकडे, त्यांच्या FD वरील व्याज देखील कमी हाेणार आहे.

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्‍हणाले की, एमपीसीने लिक्विडिटी ॲडजस्टमेंट सुविधेअंतर्गत पॉलिसी रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तात्काळ लागू होईल. स्थायी ठेव सुविधा (एसटीएफ) दर ५.२५% वर समायोजित केला जाईल. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (एमएसएफ) दर आणि बँक दर ५.७५% वर असतील." दरम्‍यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​पदभार स्वीकारल्यानंतर तिसऱ्यांदा रेपो रेट जाहीर केले. यापूर्वी त्यांनी दोन वेळा २५-२५ बेसिस पॉइंट्सनी ५० बेसिस पॉइंट्सनी कमी केला आहे. एकीकडे, दर कपातीमुळे सामान्य लोकांवरील गृहकर्जाचा भार कमी होईल तर दुसरीकडे, त्यांच्या FD वरील व्याज देखील कमी होईल.

कर्ज स्‍वस्‍त होणार

रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्स कपात झाल्‍याने येत्या काही दिवसांत गृह, वैयक्तिक, वाहन आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. परिणामी, स्थायी ठेव सुविधा (एसटीएफ) दर ५.२५% वर समायोजित केला जाईल. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (एमएसएफ) दर आणि बँक दर ५.७५% वर समायोजित केले जातील.

आरबीआयकडून यावर्षी रेपो दरात 1% कपात

आरबीआयने यावर्षी रेपो दरात सलग तिसर्‍यांदा कपात केली आहे. RBI ने या वर्षी फेब्रुवारीपासून आता 100 बेसिस पॉइंट्सने दर कमी केला आहे. तथापि, गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की आता पॉलिसीमध्ये जागा खूपच मर्यादित आहे, म्हणजेच भविष्यात व्याजदरात आणखी कपात करण्याची शक्यता कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT