अल्पवयीन मुलांना आर्थिक जबाबदाऱ्या समजण्यासाठी RBI चे मोठे पाऊल

RBI Big Announcement | १० वर्षांवरील मुलांना बँक खाते उघडता, हाताळता येणार
File Photo
RBIRBI Big Announcement
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवार २१ एप्रिल रोजी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, आता १० वर्षांवरील अल्पवयीन मुले देखील त्यांचे बचत आणि एफडी खाते स्वतः उघडून हताळू शकतील. आरबीआयने हा निर्णय का घेतला आणि त्याचे फायदे आणि तोटे काय असू शकतात? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

मुलांना आर्थिक जबाबदाऱ्या समजाव्यात...; RBIचा उद्देश

देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अल्पवयीन मुलांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. मुलांना आर्थिक जबाबदाऱ्या समजावून सांगता याव्यात म्हणून, बँकेने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच, पालकांना त्यांच्या मुलांना स्वातंत्र्य देणे सोपे झाले पाहिजे, हा देखील उद्देश असल्याचे 'RBI'ने म्हटले आहे. बँक खाते उघडताना पालक सोबत असावेत का?, कि अल्पवयीन मुले स्वत: खाते उघडू शकतात याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित बँकाच घेणार असल्याचे देखील आरबीआयने म्हटले आहे.

देशातील सर्व बँकांना नियम लागू

RBIने सोमवारी २१ एप्रिल रोजी केलेल्या घोषणेनुसार, आता १० वर्षे आणि त्याहून अधिक वयाची मुले त्यांचे बँक खाते स्वतः चालवू शकणार आहेत. RBI चा हा नवीन नियम देशातील सर्व बँकांना जसे की व्यावसायिक, घरगुती, वित्तीय संस्थांना लागू असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंबंधी बँका वेगळे नियम करू शकतात

यासोबतच, आरबीआयने सर्व बँकांना असे निर्देश दिले आहेत की, आर्थिक संकट कमी करण्यासाठी बँकांना स्वतः काही नियम निश्चित करावे लागतील. हे नियम पैसे काढणे आणि ठेवींबद्दल असू शकतात. प्रत्येक बँकेला याबाबत वेगवेगळे नियम बनवण्याची परवानगी असेल. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. यासोबतच, खाते पालकांनी उघडले आहे की मुलाने स्वतः उघडून हाताळले आहे, या दोन्ही परिस्थितीत बँकेने ठरवलेले नियम लागू असतील, असेही RBIने म्हटले आहे.

नवीन नियम कधी लागू होईल?

आरबीआयने केलेल्या घोषणेनुसार, जुलै २०२५ पासून सर्व बँकांमध्ये हा नवीन नियम लागू केला जाईल. त्यामुळे, आरबीआयने बँकांना या बदलाची तयारी आधीच पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मूल १८ वर्षांचे होताच. बँकेकडून नवीन स्वाक्षऱ्या घेतल्या जातील. यासोबतच, ही बँक खाती केवायसी नियमांनुसार उघडली जातील. याचा अर्थ असा की मुलाचे बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्डसारखे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

आरबीआयने हा नियम का आणला?

RBI ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, "मुलांना आर्थिक जबाबदाऱ्या आधीच समजाव्यात म्हणून रिझर्व्ह बँकेने हा नियम आणला आहे. त्यांना बँक कशी काम करते हे माहित असले पाहिजे. यासोबतच पालकांना जबाबदारी देणे सोपे होईल" हे उद्देश आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news