RBI MPC Meeting 2026 Live Updates Pudhari
अर्थभान

RBI MPC Meeting: तुमचा EMI कमी झाला का? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांनी घेतला मोठा निर्णय

RBI MPC Meeting 2026 Live Updates: Reserve Bank of India च्या MPC बैठकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या बैठकीकडे सामान्य नागरिकांपासून उद्योगजगतापर्यंत सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

Rahul Shelke

RBI MPC Meeting 2026 Live Updates: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली 4 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या (MPC) तीन दिवसांच्या बैठकीचा निकाल आज जाहीर झाला आहे.

या बैठकीकडे सामान्य नागरिकांपासून उद्योगजगतापर्यंत सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण या निर्णयावर होम लोन, कार लोन आणि वैयक्तिक कर्जांचे व्याजदर अवलंबून असतात. अलीकडेच जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प आणि भारत–अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर RBIने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यावेळी रेपो दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना EMI मध्ये दिलासा मिळणार नाही.

सध्या देशातील रेपो दर 5.25 टक्के इतका आहे. डिसेंबर 2025 मध्ये RBI ने 0.25 टक्क्यांची कपात केली होती. त्याआधी 2025 या वर्षात तब्बल चार वेळा व्याजदर कमी करण्यात आले होते.

मागील वर्षभरात रेपो दर कसा कमी होत गेला?

फेब्रुवारी 2025 मध्ये जवळपास पाच वर्षांनंतर प्रथमच रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला. त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा 0.25 टक्क्यांची कपात झाली. जूनमध्ये तर थेट 0.50 टक्क्यांची मोठी घट करण्यात आली. शेवटी डिसेंबरमध्ये आणखी 0.25 टक्के कपात झाली. अशा प्रकारे वर्षभरात एकूण 1.25 टक्क्यांनी रेपो दर कमी झाला आणि तो 5.25 टक्क्यांवर आला.

सामान्य माणसावर याचा काय परिणाम होतो?

रेपो दर म्हणजे RBI बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर. बँका याच आधारावर आपल्या कर्जांचे व्याज ठरवतात. रेपो दर वाढला तर गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्ज महाग होतं, EMI वाढतो. उलट रेपो दर कमी झाला तर कर्ज स्वस्त होतं आणि मासिक हप्त्यांमध्ये थोडा दिलासा मिळतो.

म्हणजेच MPC चा निर्णय थेट सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम करणारा असतो. घर घेण्याचा प्लॅन, कार खरेदी किंवा इतर खर्चाचं नियोजन सगळं काही या एका घोषणेवर अवलंबून असतं. आजच्या RBIच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT