FD Rule Change pudhari
अर्थभान

FD Rule Change: आता FD वर मिळणार घवघवीत व्याजदर... RBI मोठे बदल करण्याच्या तयारीत

Anirudha Sankpal

FD Rule Change: भारतीय रिझर्व बँकेने एक ड्राफ्ट नियम तयार केला आहे. या नियमानुसार आता तुम्हाला फिक्स डिपॉजिट आणि बँक डिपोजिटवर मिळणारे व्याज आता अजून लवचिक करण्यात येणार आहे. बँक आता मनमानी पद्धतीनं व्याजदर देऊ शकणार नाहीत. त्यांना आपल्या वेबसाईटवर आधीच आपले व्याजदराची माहिती द्यावी लागणार आहे. जर हा नियम लागू होतो तर एफडी गुंतवणुकदारांना वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदराची तुलना करणे सोपे होईल.

आरबीआयने हा नव्या नियमाचा ड्राफ्ट सार्वजनिक सल्ल्यासाठी प्रसिद्ध केला आहे. या नव्या ड्राफ्टचा उद्येश हा बँकाना मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या डिपॉझिट्सवरील व्याज दर निश्चित करण्याबाबत अजून स्वातंत्र्य देणे हा आहे. तुम्ही या ड्राफ्टवर २० जूनपर्यंत सल्ला द्यायचा आहे.

या नियमामुळं काय बदलणार?

नव्या प्रस्तावित नियमामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे पारदर्शकता येणार आहे. आरबीआयने दिलेल्या प्रस्तावाअंतर्गत सर्व बँकांना त्यांच्या व्यावासायिक दिवस सुरू होण्यापूर्वी आपल्या वेबसाआईटवर ठेव योजनेचे व्याजदर दाखवावे लागणार आहे. या नियमानुसार ठेवीवरील व्याजदर बँकेच्या वेबसाईटवर दिवस सुरू होण्यापूर्वी घोषित केलेल्या व्याजदारनुसारच असणार आहे.

याचा अर्थ बँक एफडी आणि इतर ठेव योजनांचे व्याजदर पहिल्यांदाच सार्वजनिक असणार आहेत. त्यामुळं ग्राहकांना वेगवेगळ्या बँक योजनांची तुलना करता येणार आहे. हे पाऊल व्याज दराबाबत अजून स्पष्टता येण्यासाठी आणि एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अधिक स्पष्टता आणण्यासाठी उचलण्यात आलं आहे.

बल्क डिपॉजिट म्हणजे काय?

प्रस्तावित बदल हे प्रामुख्याने बल्क डिपॉजिटशी संबंधित आहेत. बल्क डिपॉजिट म्हणजे व्यक्ती किंवा कंपन्यांकडून मोठ्या रकमेची ठेव असते. नव्या प्रस्तावित नियमानुसार बँक आफल्या फंडिगच्या गरजेनुसार आणि कॅशची स्थिती पाहून या मोठ्या ठेवींवर वेगवेगळा व्याजदर देऊ शकणार आहे.

आरबीआयनुसार बँकांना बल्क डिपॉजिटवर वेगवेगळे व्याजदर देण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. जर एका बँकेला जास्त ठेवी गोळा करण्याची गरज असेल तर ते मोठ्या ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी जास्त व्याजदर देऊ शकतात. तर ज्यांच्याकडे कॅश फ्लो चांगला आहे ते कमी व्याजदर देखील देऊ शकतात.

FD गुंतवणूकधारकांवर काय होणार परिणाम?

सर्वसाधारण रिटेल एफडी गुंतवणूकदारांसाठी याचा तात्कालिक फायदा मर्यादित असू शकतो. कारण या प्रस्तावाअंतर्गत थेट रिटेल एफडी नियमात बदल करू शकत नाही. मात्र जाणकारांच्या मते भविष्यात याचा प्रभाव संपूर्ण डिपॉजिट मार्केटवर पडू शकतो.

सर्टिफाईड फायनाशिअल प्लॅनर श्वेता शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार आधी सर्व बँकांचे एफडी दर एकसारखे होते. मात्र पुढे जाऊन ठेव रक्कम, अवधी आणि बँकेच्या फंडिंगच्या गरजेनुसार व्याजदरात तफावत दिसण्याची शक्यता आहे. आपली एफडी रिन्यू करण्यापूर्वी ग्राहकांनी वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करावी. मोठी रक्कम डिपॉजिट करण्याच्या स्थितीत चांगल्या व्याजदरासाठी बँकांसोबत निगोशिएशन देखील करायला हवं. मात्र फक्त जास्त व्याजदर पाहून गुंतवणूक करू नये.

एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काय पहावं?

  • वेळेआधी एफडी तोडण्यावर लागणारा दंड

  • स्वीप इन एफडी सुविधा

  • गरजेच्यावेळी पैशाची उपलब्धता

  • व्याज मिळण्याचे पर्याय

  • सध्याचे एफडी व्याजदर

  • एफडीवर कोण जास्त व्याजदर देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT