RBI BSBD Account New Rules 2025: बँक खात्यांतील मिनिमम बॅलन्स, डिजिटल पेमेंट्सवरील चार्जेस आणि हिडन चार्जेसमुळे ग्राहक त्रस्त होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने (RBI) आता मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने BSBD (Basic Savings Bank Deposit) अकाउंटचे नियम पूर्णपणे बदलले आहेत.
पूर्वी BSBD खाते हे लहान किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांसाठी असायचे. परंतु RBIने स्पष्ट केले की आता कोणताही ग्राहक झिरो बॅलन्सवर BSBD खाते उघडू शकतो. यासाठी
कोणताही Minimum Balance आवश्यक नाही
कोणतेही Hidden Charges लावले जाणार नाहीत
RBI ने बँकांना कडक निर्देश दिले आहेत की BSBD खात्यावर MAB (Minimum Average Balance) लागू करता येणार नाही.
Zero Balance Allowed
पेनल्टी नाही
कोणताही मिनिमम बॅलन्स नियम लावता येणार नाही
BSBD खातेदारांना मिळणार—
25 फ्री चेक लीव्हज
ATM/Debit Card पूर्णपणे Free
Annual Fee Zero
आधी अनेक बँकांमध्ये या सुविधांवर चार्जेस लावले जात होते.
RBI च्या मते डिजिटल व्यवहारांना ‘Withdrawal’ मानले जाणार नाही. त्यामुळे—
UPI Free
NEFT Free
RTGS Free
IMPS Free
Online Banking Free
दर महिन्याला ग्राहकांना 4 फ्री व्यवहार करता येतील, ज्यात—
ATM Withdrawal
Branch Withdrawal
Fund Transfer यांचा समावेश आहे. यानंतर सामान्य शुल्क लागू होईल.
BSBD खात्यांमध्ये नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसाठी कोणतेही अतिरिक्त चार्जेस आकारता येणार नाही. ज्यांच्याकडे आधीच BSBD खाते आहे, ते ह्या नवीन सुविधांची मागणी करू शकतात आणि बँकांना त्या सुविधा देणे अनिवार्य आहे.
ग्राहकाची इच्छा असल्यास आपले चालू सेव्हिंग अकाउंट BSBD मध्ये रूपांतरित करू शकतो.
बँकांनी अकाउंट 7 दिवसांत रूपांतरित करणे बंधनकारक
कोणतेही शुल्क आकारता येणार नाही
RBI ने स्पष्ट केले की प्रत्येक व्यक्ती फक्त एक BSBD खाते ठेवू शकतो.
प्रत्येक BSBD खात्यासाठी पूर्ण KYC करणे आवश्यक आहे.
सर्व बँकांनी BSBD विषयीची माहिती—
आपल्या वेबसाइटवर
शाखांमध्ये
दस्तऐवजांमध्ये सपष्टपणे दाखवणे बंधनकारक आहे.
आता UPI पासून ATM, चेकबुक, ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग… जवळपास सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत. हा बदल बँकिंग सिस्टम अधिक पारदर्शक, स्वस्त आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी करण्यात आला आहे.