Ram Mandir Ownership Pudhari
अर्थभान

Ram Mandir Ownership: अयोध्येच्या राम मंदिराचा खरा मालक कोण? येथे जमा होणारा पैसा कुठे जातो?

Who Owns the Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचा कायदेशीर मालक ‘रामलला विराजमान’ आहेत, असा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आहे. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन व दानाचे पैसे ‘श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या खात्यात जातात.

Rahul Shelke

Ram Mandir Ownership Donation Management: अयोध्येत आज ऐतिहासिक क्षण आहे, ज्याची वर्षानुवर्षे प्रतीक्षा होती. भव्य राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून मंदिराच्या शिखरावर पवित्र धर्मध्वज फडकवला जाणार आहे. श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक गौरवाचे प्रतीक असलेल्या या ध्वजारोहणासोबतच एक प्रश्न अनेकांच्या मनात आहे, तो म्हणजे राम मंदिराचा खरा मालक कोण आहे? आणि येथे येणारा पैसा नेमका कुठे जातो?

राम मंदिराचा कायदेशीर मालक कोण?

अयोध्येतील राम मंदिर हे केवळ धार्मिक भावना किंवा पूजा-अर्चनेचे केंद्र नाही, तर लाखो-कोट्यवधी भक्तांची आस्था, विश्वास आणि दानाचे सर्वात मोठे तीर्थस्थान बनले आहे. पण मंदिराचा कायदेशीर मालक कोण आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला.

सुप्रीम कोर्टाने मंदिराची संपूर्ण जमीन ‘रामलला विराजमान’ यांची कायदेशीर मालमत्ता असल्याचे जाहीर केले. म्हणजेच, मंदिराचा खरा मालक भगवान रामांचे बालस्वरूप, रामलला यांनाच मानले जाते.

मात्र, या विशाल मंदिराचे व्यवस्थापन, विकास आणि आर्थिक देखरेख सरकारी पातळीवर स्थापन झालेल्या ‘श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’कडे आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये केंद्र सरकारने या ट्रस्टची स्थापना केली आणि मंदिराशी संबंधित सर्व अधिकार यांना सोपवले.

मंदिरात जमा होणारा पैसा कोणाकडे जातो?

अयोध्या राम मंदिरात दररोज कोट्यवधी रुपयांची देणगी येत असते. छोट्या रकमांपासून ते मोठ्या रकमेपर्यंत, तसेच सोने, चांदी आणि महागड्या वस्तूंच्या स्वरूपातही दान केले जाते.

ही संपूर्ण देणगी थेट ‘तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या बँक खात्यांमध्ये जमा होते. मंदिरात अनेक देणगी काउंटर आहेत आणि प्रत्येक देणगीला पावती दिली जाते. दानपेट्यांमधून रक्कम काढण्याची प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे चालते, SBI अधिकारी आणि ट्रस्ट सदस्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण हिशेब ठेवला जातो.

दानाचा प्रत्येक रुपया कुठे वापरला जातो?

मार्च 2023 पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, ट्रस्टच्या खात्यांमध्ये 3,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली होती. यापैकी सुमारे 1,000 कोटी रुपये मंदिराच्या बांधकामासाठी वापरले गेले आहेत.

उर्वरित निधी खालील कामांसाठी वापरला जातो:

  • मंदिर परिसराचा विस्तार

  • सुरक्षा व्यवस्था

  • धार्मिक कार्यक्रम

  • भक्तांसाठी सुविधा

  • दीर्घकालीन विकास योजना

ट्रस्टने स्पष्ट केले आहे की दानाच्या प्रत्येक रुपयाचा योग्य वापर केला जातो आणि सर्व व्यवहारांची नोंद ठेवली जाते. आर्थिक पारदर्शकतेसाठी ऑडिट प्रक्रियाही नियमितपणे केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT