Rahul Gandhi’s Favourite Stock ICICI Bank Jumps: शेअर बाजारात सध्या चढ-उतार सुरू असले तरी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘फेव्हरेट’ शेअर मालामाल करतोय. राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओतील एक महत्त्वाचा शेअर म्हणजे आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) बाजारमूल्यात काही तासांत तब्बल 17 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
आज शुक्रवारी सकाळपासूनच आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसत होती. दुपारी 2.55 वाजेपर्यंत हा शेअर 1.76 टक्क्यांनी वाढून 1,343.65 रुपये या दराने व्यवहार करत होता. काही वेळातच तो दिवसाच्या उच्चांकावर म्हणजे 1,344.20 रुपयांपर्यंत पोहोचला. आज हा शेअर 1,318.55 रुपयांवर उघडला होता, तर मागील दिवशी तो 1,320.40 रुपयांवर बंद झाला होता.
31 जुलै रोजी बँकेचा शेअर 1,494.10 रुपये या पातळीवर गेला होता, जो गेल्या 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. म्हणजेच गेल्या शंभर दिवसांत शेअर किंचित खाली आला असला, तरी त्यात जोरदार वाढ झाली आहे.
या वाढीमुळे बँकेच्या बाजारमूल्यात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी बँकेचे एकूण बाजारमूल्य 9,43,568.59 कोटी रुपये होते, जे शुक्रवारी वाढून 9,60,576.26 कोटी रुपये झाले. म्हणजेच केवळ एका दिवसात 17,007.67 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, जी अनेक मिडकॅप कंपन्यांच्या एकूण मूल्याएवढी आहे.
राहुल गांधी यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आयसीआयसीआय बँकेतील त्यांच्या शेअर्सचा उल्लेख केला होता. त्यांच्या नावावर 2,299 शेअर्स आहेत. त्या वेळी म्हणजे 3 मे 2024 रोजी या शेअरची किंमत 1,142 रुपये होती. म्हणजेच त्या वेळी त्यांच्या या शेअर्सचे एकूण मूल्य 26,25,458 लाख रुपये इतके होते.
सध्याच्या दरानुसार या शेअर्सची किंमत 30.90 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच फक्त दीड वर्षात राहुल गांधींना सुमारे 4.65 लाख रुपयांचा नफा झाला आहे. आयसीआयसीआय बँक ही देशातील अग्रगण्य खाजगी बँक असून, तिच्या शेअर्सवर नेहमीच गुंतवणूकदारांचा विश्वास राहिला आहे.