How PMMY Helps Small Businesses: स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा देणारी योजना सध्या चर्चेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत आता विना हमी (गॅरंटीशिवाय) तब्बल 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. विशेष म्हणजे हे कर्ज कोलॅटरल फ्री आहे, म्हणजे मालमत्ता तारण ठेवण्याची गरज नाही.
ही योजना याआधी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत होती. मात्र केंद्र सरकारने यामध्ये वाढ करून ही मर्यादा दुप्पट करत 20 लाख केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्प भाषणात ही घोषणा केली होती. त्यामुळे नव्या उद्योगांना तसेच आधीपासून चालू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
मुद्रा योजनेत व्यवसायाच्या गरजेनुसार कर्ज चार प्रकारांमध्ये दिलं जातं.
शिशु – 50 हजार रुपयांपर्यंत
किशोर – 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत
तरुण – 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत
तरुण प्लस – 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत
म्हणजे छोट्या व्यवसायापासून मोठ्या विस्तारापर्यंत, गरजेनुसार कर्ज मिळू शकतं.
प्रधानमंत्री मुद्रा योजना ही मोदी सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. ही योजना मुख्यतः अशा लोकांसाठी आहे, जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात किंवा आधीच्या व्यवसायाचा विस्तार करु इच्छितात.
या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यासाठी कोणतीही शैक्षणिक अट नाही.
अर्जदार 8वी पास असला तरीही तो या कर्जासाठी पात्र ठरतो. म्हणजेच केवळ पदवीधारकांसाठीच नाही, तर सामान्य लोकांसाठीही ही योजना फायदेशीर आहे.
मुद्रा कर्जासाठी काही कागदपत्रं आवश्यक आहेत. त्यामध्ये—
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी पुरावा
पासपोर्ट साईज फोटो
व्यवसायाचा प्लॅन (Business Plan)
KYC कागदपत्र
उत्पन्नाचा पुरावा (Income Proof)
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दोन सोपे मार्ग आहेत—
ऑनलाइन अर्ज – मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो.
बँकेत जाऊन अर्ज – जवळच्या बँकेत प्रत्यक्ष जाऊन अर्ज करता येतो.
एकूणच, स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल किंवा छोटा व्यवसाय वाढवायचा असेल, तर मुद्रा योजना ही अनेकांसाठी मोठी संधी आहे.