PM Kisan 24th Installment Update Pudhari
अर्थभान

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2,000 रुपये; पीएम किसानच्या 24व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, तारीख जाहीर

PM Kisan 24th Installment Update: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली असून, पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

Rahul Shelke

PM Kisan 24th Installment Update: देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. हा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळणार आहेत. दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांना सणाच्या खर्चासाठी मोठा आधार मिळू शकतो.

ऑक्टोबरमध्येच मिळणार 24वा हप्ता?

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

योजनेचा 23वा हप्ता 20 जून रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर शेतकरी 24व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतील हप्ता 19 नोव्हेंबर रोजी वितरित करण्यात आला होता. यंदा मात्र ऑक्टोबरमध्येच पैसे मिळणार आहेत.

24वा हप्ता मिळवण्यासाठी ही दोन कामे पूर्ण करा

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी काही आवश्यक बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. तुमची कागदपत्रे किंवा नोंदणी अपूर्ण असल्यास हप्त्याची रक्कम मिळण्यात अडचण येऊ शकते.

1. ई-केवायसी पूर्ण करा

तुमची ई-केवायसी अद्याप पूर्ण झाली नसेल, तर ती लवकरात लवकर पूर्ण करा. यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सुविधेचा वापर करता येतो. आवश्यकतेनुसार जवळच्या सीएससी केंद्राची मदतही घेता येईल.

2. फार्मर रजिस्ट्रीची स्थिती तपासा

तुमची फार्मर रजिस्ट्री झाली आहे का, हे तपासा. नोंदणी बाकी असल्यास किंवा काही माहिती अपूर्ण असल्यास संबंधित अधिकृत यंत्रणेकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्या. राज्यातील लागू नियमांनुसार आवश्यक अटी तपासणे महत्त्वाचे आहे.

पीएम किसानच्या लाभार्थी यादीत नाव कसे तपासाल?

तुमचे नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही, हे घरबसल्या ऑनलाइन तपासता येते.

  1. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmkisan.gov.in/

  2. वेबसाइटवरील Beneficiary List हा पर्याय निवडा.

  3. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तालुका किंवा ब्लॉक आणि गाव निवडा.

  4. सर्व माहिती भरल्यानंतर Get Report या पर्यायावर क्लिक करा.

  5. त्यानंतर तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यामध्ये तुमचे नाव तपासा.

शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे?

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थी यादीतील नाव, ई-केवायसी आणि बँक खात्याशी संबंधित माहिती योग्य असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आपल्या नोंदणीची स्थिती तपासा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT