penny stock multi baggers last five years : भारतीय स्टॉक मार्केटमध्ये गेल्या चार वर्षात अनेकांनी अद्भूत अशी संपत्ती कमवली आहे. मात्र सर्वात मोठा लाभ हा सर्वात धोकादायक समजल्या जाणाऱ्या पेनी स्टॉक्समधून होतो. १९ मे च्या डेटानुसार किमान ११ अत्यंत कमी किंमतीच्या स्टॉक्सनी मे २०२१ पासून जवळपास १०,००० टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. यामुळं या स्टॉक्समधील तुमची छोटी गुंतवणूक देखील तुमचा मोठा फायदा करून गेली आहे.
अशा स्टॉक्समध्ये सर्वात वरच्या क्रमांकावरचा स्टॉक म्हणजे डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर. या स्टॉकची किंमत १९ मे २०२१ मध्ये ९ पैसे होती. आता त्याची किंमत ही २४.२७ रूपये झाली आहे. त्याने या काळात २ लाख १० हजार टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. या स्टॉकमध्ये ज्यांनी २०२१ मध्ये १ लाख रूपये गुंतवले असतील त्यांची किंमत आता जवळापस २१ कोटी रूपयांच्या वर गेली आहे.
हा मोठा परतावा गुंतवणूकदार भारताच्या ऊर्जा वहन, केबल, इन्फ्रास्ट्रक्चर बूम आणि यावर होणाऱ्या सरकारी खर्चाच्या आणि खासगी कॅपेक्स रिकव्हरीमुळं झाला आहे. दुसऱ्या बाजूला स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज या कंपनीच्या स्टॉक्सने दखील दमदार कामगिरी केली आहे. गेल्या चार वर्षात हा स्टॉक्स २.८५ रूपयांपासून २१०.२१ रूपयांपर्यंत पोहचला आहे. या स्टॉक्सने या काळात जवळपास ६५,००० हजार टक्के रिटर्न दिले आहेत.
डिफेन्स क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सरकारने देखील देशांतर्गत उत्पादनाला चांगला पुश दिला आहे. त्यामुळं संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाच्या संधी वाढल्या आहेत. Stellant Securities ने देखील जवळपास ३८,००० टक्के, while East India Drums आणि Barrels Manufacturing देखील जवळपास ३०,००० टक्क्यांनी वाढले आहेत.
याच्या जोडीलाच नर्चर वेल इंडस्ट्रीज, इडोसोलार, ओनिक्स सोलार एनर्जी, परीमल फायनान्स, सिटी पल्स मल्टीव्हेन्चर, IMEC Services आणि नॉलेज मरीन इंजिनिअरिंग वर्क्स या कंपन्यांचे पेनी स्टॉक्स देखील मोठी कमाई देऊन गेले आहेत.
२०२१ नंतर इक्विटीमध्ये रिटेल पार्टिसिपेशन (शेअर मार्केटमधील सामान्य नागरिकांची वाढती गुंतवणूक) यामुळे देखील या स्टॉक्सच्या किंमतीत इतकी वाढ झाली असू शकते. तसेच या स्टॉक्सच्या कमी किंमतीचा देखील परिणाम असू शकतो. त्यामुळं अंदाजे खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढते. जरी छोटी किंमत वाढली तरी ती टक्केवारीत मोठी दिसते.
डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर (Diamond Power Infrastructure) २,१०,२३३%
स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज (Swan Defence and Heavy Industries) ६५,२३५%
स्टेलंट सिक्युरिटीज (इंडिया) (Stellant Securities (India)) ३८,३९३%
ईस्ट इंडिया ड्रम्स अँड बॅरल्स मॅन्युफॅक्चरिंग (East India Drums And Barrels Manufacturing) २९,७७५%
नर्चर वेल इंडस्ट्रीज (Nurture Well Industries) २२,३२२%
इंडोसोलार (Indosolar) १९,३११%
ओनिक्स सोलर एनर्जी (Onix Solar Energy) १५,३१५%
पिरामल फायनान्स (Piramal Finance) १२,१२०%
सिटी पल्स मल्टिव्हेंचर्स (City Pulse Multiventures) ११,६८१%
आयएमईसी सर्व्हिसेस (IMEC Services) १०,७४८%
नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स (Knowledge Marine & Engineering Works) १०,५८०%
मात्र शेअर मार्केटमधील जाणकारांच्या मते अशा प्रकारच्या रॅलीमध्ये मोठा धोका देखील असतो. लार्ज कॅप कंपन्यांमध्ये स्टेबल अर्निंग असते. संस्थात्मक मालकी आणि मजबूत लिक्विडिटी असते. पेनी स्टॉक्स हे सहसा अतिशय अस्थीर आणि मोठ्या घसरणीचा धोका असलेले असतात.