गेल्या आठवड्यात निफ्टीने 25078.30 चा उच्चांक नोंदवला होता. Pudhari File Photo
अर्थभान

निफ्टीचे पंचवीस हजारच्या गंगेत घोडे न्हाले, पण...

गेल्या आठवड्यात बाजारात काय झाले?

पुढारी वृत्तसेवा
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

अखेर निफ्टीचे पंचवीस हजारच्या गंगेत घोडे न्हाले. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सोमवार, दिनांक 29 जुलै रोजी निफ्टीने जणू 25000 पार करण्याचा संकल्प केला होता; परंतु त्या दिवशी 24999.75 ला केवळ चरणस्पर्श करून निफ्टी माघारी परतला. पुढील दोन दिवसही अनुक्रमे 24971.75 आणि 24984.6 पर्यंत जाऊन निफ्टीने 25000 पार करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर गुरुवारी म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी निफ्टीने 25078.30 चा उच्चांक नोंदवला सेन्सेक्सनेही 82129.49 चा उच्चांक नोंदवला.

भारतीय बाजारात हे तेजीचे वारे वाहत असतानाच गुरुवारी अमेरिकेत इकॉनॉमिक डेटा प्रसिद्ध झाला Manufacturing Activity मोजणार्‍या मापकांत 46.8 हा आठ महिन्यांतील नीचांक दाखवला, जो तेथील अर्थतज्ज्ञांनी 48.8 असा अपेक्षिला होता. बेरोजगार लोकांचा आकडा 249000 पर्यंत गेला. जो अर्थतज्ज्ञांनी 236000 अपेक्षिला होता.

या अशक्त आर्थिक कामगिरीमुळे अमेरिकेत पुन्हा मंदीचे सावट येईल काय, अशी आशंका सर्वत्र निर्माण झाली. त्यामुळे अमेरिकेतील डाऊ जोन्स आणि आणि एस अँड पी 500 हे निर्देशांक सव्वा टक्क्यांहून अधिक कोसळले, तर नासडॅक अडीच टक्क्यांनी कोसळला. एशियन मार्केटसमध्ये शुक्रवारी याची प्रतिक्रिया उमटली. जपानचे निकेई आणि टॉपिक्स हे दोन्ही निर्देशांक पाच टक्के, तर कोस्पी आणि कोसडॅक हे कोरियाचे निर्देशांक अडीच टक्के कोसळले; परंतु शुक्रवारी भारतीय बाजार केवळ 1 टक्क्यांच्या थोडा अधिक कोसळला. खरे म्हणजे लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतरचा अर्थसंकल्प या दोन महत्त्वाच्या घडामोडीनंतर बाजारात सुरू असलेली एकतर्फी तेजी खंडित होऊन बाजारात मोठे करेक्शन येईल, अशी चर्चा असताना बाजार खाली जाण्याचे नाव घेत नाही, यावरून भारतीय बाजाराचा वर वर जाण्याचा निर्धार दिसून येत आहे. परदेशी गुंतवणूक संस्थांची (FII) 12756.20 कोटी रुपयांची आठवड्यातील जोरदार विक्रीही परिणामशून्य ठरली. कारण रिटेल इन्व्हेस्टर्स, देशी गुंतवणूक संस्था (DII) यांची अखंड खरेदी सुरू आहे. म्युच्युअल फंडांमध्ये लोकांची अभूतपूर्व गुंतवणूक या तेजीला हातभार लावत आहे. एनएफओंची वाढलेली संख्या आणि त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद या गोष्टी भारतीय बाजारावरील सामान्य जनतेचा विश्वास दाखवून देतात. इतकेच नाही, तर इन्फ्रा, फार्मा, हेल्थ केअर, कंझुम्प्शन आदी सेक्टरला फंडांकडे लोक मोठ्या संख्येने वळत आहेत. त्यावरून बाजारातील जोखीम स्वीकारण्याची जनतेची वाढलेली मानसिकता दिसून येत आहे, हा जोरदार अर्थप्रवाह हाच तेजीची पायाभरणी करतो.

या सप्ताहात निफ्टी पुन्हा 25000 च्या वर गेला, तर तो सरळ 25500 पर्यंत जाईल. 24682.77 हा निफ्टीचा 100 DMA आहे. तो सपार्ट धरता येईल. शुक्रवारचा निफ्टीचा नीचांक लक्षात घेतला (24686.85) तर येथूनच बाजार फिरल्याचे लक्षात येईल. या आधार पातळीचा निफ्टीने आदर केला, तर प्रथम लक्ष 25500 आणि पुढील लक्ष 25800 निफ्टी साध्य करेल, असे वाटते. गुंतवणूकदारांनी आणि ट्रेडर्सनी स्वतः अभ्यास करून किंवा त्यांच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्यावा. खालील काही स्टॉक्सच्या चार्टस्चा अभ्यास केला, तर हे शेअर्स Bullish दिसून येतील. माल ट्रेडर्सनी स्वतः त्यांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT