Investment Plan  file photo
अर्थभान

Investment Plan | आता पैशांच्या मागे धावू नका, आर्थिक सवयींच्या 'या' टिप्स वाचा; पैसा तुमच्यासाठी धावेल...

Financial Planning Tips in Marathi | बहुतेक लोक पैशांच्या मागे धावतात; पण खरी मजा तेव्हा येते, जेव्हा पैसा तुमच्यासाठी धावतो. पैसा धावण्यासाठी अशा सोप्या आर्थिक सवयीच्या टिप्स आहेत...

पुढारी वृत्तसेवा

Financial Planning Tips in Marathi |

बहुतेक लोक पैशांच्या मागे धावतात; पण खरी मजा तेव्हा येते, जेव्हा पैसा तुमच्यासाठी धावतो. पैसा धावण्यासाठी अशा सोप्या आर्थिक सवयीच्या टिप्स आहेत, ज्या कोणत्याही व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि तणावमुक्त बनवू शकतात. या पद्धतींमध्ये करोडो रुपयांची गरज नाही, ना कोणत्याही मोठ्या क्लिष्ट योजनेची गरज. यासाठी फक्त थोडी काटेकोर योजना, शिस्त आणि सतत प्रयत्न यांची आवश्यकता आहे. अर्थनियाजन करताना काही महत्त्वाच्या टिप्स...

दोन महिन्यांचा पगार वाचवा

आपल्या दोन महिन्यांच्या पगाराइतके पैसे वाचवून ठेवा. यामुळे महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये पैशांची चणचण होणार नाही आणि अचानक कोणताही खर्च आल्यास तो हाताळणे आपल्याला सोपे जाईल. अशा प्रकारे सुरुवात करा.

इमर्जन्सी फंड तयार करा

कधीही नोकरी जाऊ शकते किंवा वैद्यकीय आणीबाणी येऊ शकते. अशा परिस्थितीत, किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्चा इतका आपल्यासाठी फंड तयार ठेवा.

मौज-मजेसाठी थोडे बजेट काढून ठेवा

बचत म्हणजे आपला प्रत्येक आनंद सोडणे नव्हे. आपल्या कमाईतील ५ ते ७ टक्के आपल्या आवडी-निवडीसाठी अवश्य ठेवा, मग ते नवीन शूज असोत किंवा एखादी छोटी ट्रिप करणे असो. निवृत्ती (रिटायरमेंट) फंडाची सुरुवात करा : तुम्ही २५ वर्षांचे असाल किंवा ३५ वर्षांचेअसाल, निवृत्तीसाठी आतापासूनच ५-१०% बचत करणे सुरू करा. जितक्या लवकर बचतीची सुरुवात कराल, तितका मिळणाऱ्या व्याजाचा फायदा जास्त मिळेल.

त्वरित पैसे मिळण्याचे मार्ग शोधा

तुम्ही केवळ असणाऱ्या नोकरीवरच अवलंबून राहू नका. काहीतरी असे करण्याचा विचार करा जसे की, भाड्याने सामान देणे, डिजिटल प्रोडक्ट बनवणे किंवा कोणताही छोटा साईड बिझनेस. यामुळे कमाई होईल.

नियमित गुंतवणूक करा

प्रत्येक महिन्यात आपल्या कमाईतील ५-१०% गुंतवणूक करा. मग ते शेअर मार्केट, एसआयपी किंवा सोने काहीही असो. यात नियमित गुंतवणूक करा. ही सवय हळूहळू तुमची संपत्ती वाढवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT