NSE, BSE Closed Today for Christmas: शेअर बाजारात सध्या चढ-उतार दिसत असताना, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आज, गुरुवारी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या सुट्टीमुळे भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचे व्यवहार होणार नाहीत. बाजारातील व्यवहार शुक्रवार, 26 डिसेंबर 2025 पासून पुन्हा सुरू होतील.
आज ख्रिसमसच्या दिवशी BSE आणि NSE या दोन्ही एक्सचेंजवर सर्व प्रमुख सेगमेंट्स बंद राहणार आहेत. यात
– इक्विटी ट्रेडिंग
– इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज
– सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग (SLBs)
– करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज
– इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज
यांचा समावेश आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स कोणताही व्यवहार करू शकणार नाहीत.
कमोडिटी बाजारात व्यवहार करणाऱ्यांसाठीही आज काही बदल होणार आहेत. MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर
– सकाळचे सत्र पूर्णपणे बंद राहील
– मात्र संध्याकाळचे सत्र सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होईल
तरीही, आज कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये व्यवहार मर्यादित असतील आणि पूर्ण गतीने ट्रेडिंग शुक्रवारपासूनच सुरू होईल.
ख्रिसमस ही डिसेंबर महिन्यातील एकमेव शेअर बाजाराची सुट्टी आहे. तसेच ही 2025 मधील शेवटची ट्रेडिंग सुट्टी आहे. आता बाजार नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होईल.
2026 साठी NSE ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी
दरम्यान, NSE ने 2026 साठीचा ट्रेडिंग हॉलिडे कॅलेंडरही जाहीर केले आहे.
– 2026 मध्ये शेअर बाजार एकूण 15 दिवस बंद राहणार आहे
– यापैकी 4 सुट्ट्या शनिवार किंवा रविवारी येत असल्याने त्या दिवशी बाजार बंद असेल
– 2026 मधील पहिली सुट्टी 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी असेल
2026 मध्ये मार्च महिना शेअर बाजारासाठी सर्वाधिक सुट्ट्यांचा महिना ठरणार आहे. या महिन्यात बाजार खालील कारणांमुळे बंद राहील –
– 3 मार्च : होळी
– 26 मार्च : श्रीराम नवमी
– 31 मार्च : महावीर जयंती
यामुळे मार्चमध्ये एकूण तीन ट्रेडिंग सुट्ट्या असतील.
फेब्रुवारी, जुलै आणि ऑगस्ट 2026 या महिन्यांत एकही ट्रेडिंग सुट्टी नसेल, कारण त्या महिन्यांतील राष्ट्रीय सुट्ट्या वीकेंडला येत आहेत.
मुहूर्त ट्रेडिंगची तारीख ठरली
NSE ने हेही स्पष्ट केलं आहे की दिवाळी निमित्त मुहूर्त ट्रेडिंग सत्र रविवार, 8 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित केलं जाईल.