Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; बँक निफ्टी नवीन उच्चांकावर, बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात तेजीसह केली असून बँकिंग शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे बँक निफ्टीने नवीन उच्चांक गाठला. PSU बँकांसह बहुसंख्य इंडेक्स हिरव्या रंगात व्यापार करत होते.

Rahul Shelke

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात तेजीसह झाली. ओपनिंगच्या वेळी सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात उघडले असले, तरी थोड्याच वेळात मुख्य निर्देशांकांमध्ये घसरण झाली. मात्र बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे बँक निफ्टीने नवीन उच्चांक गाठला. ओपनिंगनंतर सेन्सेक्स सुमारे 165 अंकांनी वर होता, तर निफ्टी सुमारे 50 अंकांच्या वाढीसह 25,960 च्या आसपास ट्रेड करत होता. बँक निफ्टीत जवळपास 240 अंकांची वाढ झाली.

बहुतेक सेक्टर्समध्ये तेजी

PSU बँक इंडेक्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. त्याचबरोबर मीडिया, रिअल्टी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, FMCG आणि प्रायव्हेट बँकिंग इंडेक्समध्येही चांगली खरेदी झाली. जवळजवळ सर्व सेक्टोरल इंडेक्स हिरव्या रंगात ट्रेड करत होते. ओपनिंगच्या वेळी सेन्सेक्स 138 अंकांनी वाढत 84,700 वर उघडला. तर निफ्टी 38 अंकांनी वाढत 25,948 वर उघडला, आणि बँक निफ्टी 179 अंकांच्या वाढीसह 58,696 वर सुरू झाला.

अमेरिकेच्या निर्णयांचा भारतीय बाजारावर प्रभाव

टॅरिफमध्ये सवलत

अमेरिकेने वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर चहा, कॉफी, मसाले यांसह 200 हून अधिक खाद्यपदार्थांवरील टॅरिफ कमी केला आहे. या निर्णयामुळे भारताच्या FMCG आणि कृषी निर्यात क्षेत्राला फायदा होण्याची अपेक्षा आहे.

मुक्त व्यापार करारावर चर्चा

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की भारताची अमेरिका, युरोपियन युनियन, न्यूझीलंड आणि इतर काही देशांसोबत मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. हे करार झाल्यास भारतीय उद्योगांना नवीन बाजारपेठा मिळू शकतात आणि निर्यात वाढू शकते.

Moody’s ने व्यक्त केला भारताच्या वाढीवर विश्वास

रेटिंग एजन्सी मूडीजने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक आढावा देत या वर्षी GDP वाढ 7% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. 2027 मध्ये ही वाढ सुमारे 6.5% असेल असे एजन्सीने म्हटले आहे.

जागतिक बाजारांकडून मिश्र संकेत

GIFT निफ्टी सुमारे 50 अंकांच्या वाढीसह 26,000 च्या वर ट्रेड करत होता. अमेरिकन बाजारांमध्ये शुक्रवारी चढ-उतार दिसून आले. डाऊ 300 अंकांनी घसरला, परंतु तीन दिवसांच्या घसरणीनंतर नॅस्डॅकमध्ये मोठी वाढ झाली.

FII-DIIचा कल

FIIs ने सलग पाचव्या दिवशी जवळपास ₹5,000 कोटींची विक्री केली. उलट DII ने सलग 55 दिवसांच्या खरेदीचा क्रम कायम ठेवत शुक्रवारीही सुमारे ₹8,500 कोटी बाजारात गुंतवले. DII ची खरेदी बाजाराला आधार देऊ शकते.

कंपनी अपडेट्स

Tata Motors PVचे निकाल

डीमर्जरनंतर Tata Motors PV चे पहिले तिमाही निकाल घसरले आणि कंपनी नफ्यातून तोट्यात गेली. Max Healthcare, Glenmark, Siemens आणि Inox Wind यांचे निकाल मिश्र होते. Oil India आणि Exide चे निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याने हे शेअर्स घसरु शकतात.

Kotak Mahindra Bank चा महत्त्वाचा निर्णय

बँकेचे बोर्ड 21 नोव्हेंबरला स्टॉक स्प्लिट वर निर्णय घेणार आहे. मंजुरी मिळाल्यास बँक 15 वर्षांनंतर शेअर्स स्प्लिट करणार आहे, ज्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांची भागीदारी वाढू शकते.

Fujiyama Power Systems IPO

Fujiyama Power Systems चा IPO आज, 17 नोव्हेंबरला बंद होत आहे. आतापर्यंत तो 40% सबस्क्राइब झाला आहे. किंमत ₹216–₹228 ठेवण्यात आली आहे.

Capillary Technologies IPO

या IPO ला पहिल्या दिवशी 28% प्रतिसाद मिळाला. किंमत ₹549–₹577 आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT