Swiggy, Zomato Business Model Pudhari
अर्थभान

Swiggy, Zomato Business Model: स्विगी आणि झोमॅटो कंपन्या पैसे कसे कमावतात? डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?

Swiggy Zomato Earnings: Swiggy आणि Zomato हे प्लॅटफॉर्म रेस्टॉरंटकडून 15 ते 25 टक्के कमिशन घेतात. मात्र डिलिव्हरी कामगारांना एका ऑर्डरमागे साधारण 20 ते 40 रुपयेच मिळतात.

Rahul Shelke

Swiggy Zomato Delivery Earnings Explained: आजकाल Swiggy, Zomato सारखे फुड-डिलिव्हरी आणि ग्रॉसरी (किराणा) डिलिव्हरी अ‍ॅप्स आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत. मोबाईलवर एक क्लिक केलं की घरपोच जेवण मिळतं. पण Swiggy, Zomato सारखे प्लॅटफॉर्म कशी कमाई करतात आणि डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांना नेमका किती पगार मिळतो, जाणून घेऊया.

रेस्टॉरंटकडून कमिशन मिळत

Swiggy आणि Zomato हे प्लॅटफॉर्म रेस्टॉरंटकडून प्रत्येक ऑर्डरवर मोठं कमिशन घेतात. साधारणपणे एकूण बिलाच्या 15 ते 25 टक्के इतकं कमिशन घेतलं जातं. हे प्रमाण रेस्टॉरंटची जागा, लोकप्रियता आणि ऑर्डरची संख्या यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, एखाद्या रेस्टॉरंटचा महिन्याला 1लाख रुपयांचा व्यवसाय जर Swiggyवरून होत असेल, तर त्यातून सुमारे 20 हजार रुपये कमिशन स्वरूपात प्लॅटफॉर्मला द्यावे लागतात.

ग्राहक आणि रेस्टॉरंटवर परिणाम

इतकं मोठं कमिशन दिल्यामुळे अनेक रेस्टॉरंट्सचा नफा कमी होतो. त्यामुळे काही ठिकाणी अ‍ॅपवर दिसणाऱ्या पदार्थांच्या किमती रेस्टॉरंटपेक्षा जास्त असतात. परिणामी, ग्राहकांनाही तेच जेवण थोडं महागात मिळतं.

डिलिव्हरी कामगारांना किती पैसे मिळतात?

ग्राहक डिलिव्हरी फी भरतो, पण ती पूर्ण रक्कम डिलिव्हरी पार्टनरच्या खिशात जात नाही. बहुतांश वेळा डिलिव्हरी कामगारांना फिक्स बेस पेमेंट आणि त्यावर अंतर, वेळ आणि ऑर्डरच्या संख्येनुसार बोनस मिळतो.

साधारणपणे एका ऑर्डरमागे त्यांना 20 ते 40 रुपये मिळतात. लांब अंतर, पाऊस, गर्दीची वेळ (लंच-डिनर) किंवा जास्त ऑर्डर पूर्ण केल्यास थोडा जास्त इंसेंटिव्ह मिळू शकतो. मात्र पेट्रोल, मोबाईल रिचार्ज, गाडीचा मेन्टेनन्स असा सगळा खर्च डिलिव्हरी पार्टनरलाच करावा लागतो. त्यामुळे प्रत्यक्ष होणारी कमाई अपेक्षेपेक्षा खूपच कमी असते.

प्लॅटफॉर्म किती पैसे कमावतात?

दुसरीकडे Swiggy, Zomato सारखे प्लॅटफॉर्म रेस्टॉरंट कमिशन, डिलिव्हरी फी, प्लॅटफॉर्म फी, जाहिरात अशा अनेक मार्गांनी मोठी कमाई करतात. ही रक्कम तंत्रज्ञान, मार्केटिंग, ब्रँडिंग आणि लॉजिस्टिक्स नेटवर्क चालवण्यासाठी वापरली जाते. झोमॅटोने (Zomato) आर्थिक वर्ष 2025 मध्ये सुमारे ₹20,243 कोटी महसूल कमावला असून कंपनी नफ्यात (Profit) आहे. मात्र स्विगीचा महसूल सुमारे ₹ 15,227 कोटी होता, मात्र कंपनी अजूनही तोट्यात (Loss) आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT