LPG cylinder price hike:
नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी करण्यात आली आहे. दरम्यान, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही. घरगुती सिलिंडर अजूनही ८ एप्रिल २०२५ रोजी निश्चित केलेल्या दरानेच मिळत आहेत.
एलपीजीच्या किमती १,७४०.५० रुपयांवर गेल्यानंतर दिल्लीत १९ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत आता १,७४०.५० रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये किंमत १,८४४.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत आता १६९२.०० रुपयांना उपलब्ध होईल, जे पूर्वी १६४२.५०.५० रुपये होते. चेन्नईमध्ये किंमत १८९९.५० रुपयांवर पोहोचली आहे. सरकारने व्यावसायिक सिलिंडरमध्ये ५० रुपयांची वाढ केली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरले जातात.
घरगुती वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. हा शेवटचा बदल ८ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आला होता. सध्या दिल्लीत त्याची किंमत ८५३ रुपये आहे. कोलकातामध्ये ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये, चेन्नईमध्ये ८६८.५० रुपये, लखनऊमध्ये ८९०.५० रुपये, अहमदाबादमध्ये ८६० रुपये, हैदराबादमध्ये ९०५ रुपये, वाराणसीमध्ये ९०५ रुपये. पटनामध्ये ९१६.५० आणि १४ किलोचा सिलिंडर ९५१ रुपयांना उपलब्ध आहे.