Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या घसरणीनंतर आता मोठी उसळी देखील पहावयास मिळत आहे. मंगळवारी रात्री सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाली होती. मंगळवारी एमसीएक्सवर चांदीचे दर ५.५८ टक्क्यांनी तर सोनं २.४५ टक्क्यांनी घटल होतं. मात्र बुधावारी सोने आणि चांदीच्या दरांनी रिकव्हरी केली आहे.
MCX वरीत सोनं १.३ टक्क्यांनी अर्थात १९०० रूपयांनी वाढलं आहे. आता सोन्याचे १० ग्रॅमचे दर १.५३ लाखांपर्यंत पोहचले आहेत. तर चांदीच्या दरांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. चांदीची किंमत बुधवारी ४ टक्क्यांनी वाढली असून चांदीचे दर जवळपास ९००० रूपयांनी वाढले आहेत. चांदीचे प्रती किलो दर हे २.३८ लाख रूपये झाले आहेत. सोने आणि चांदी यांचे दर झपाट्यानं वाढत असल्यानं त्यांच्या ईटीएफमध्ये देखील ३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारच्या उतारानंतर ही उसळी आली आहे. चांदीचे दर आता २.२६ लाखांपर्यंत पोहचले आहेत. तर सोन्याची किंमत ही १.५० लाख पार गेली आहे. जाणकारांच्या मते सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाल्यानंतर आता खालच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली आहे.
दुसरीकडं इराणने होर्मुज जलमार्गाचे काही भाग तात्पूर्ते बंद केले आहेत. या जलमार्गाद्वारे जगाची २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते. याचबरोबर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव देखील वाढला आहे. त्यामुळं जाणकारांच्या मते भू राजकीय तणाव यामुळे देखील सोने चांदी दरात वाढ झाली आहे.
MCX सोन्याबाबत याबाबत आपले मत व्यक्त करताना अनरिच मनी चे सीईओ पोनमुडी आर यांनी सांगितलं की mcx गोल्ड फ्युचर्स 1,80,000-1,81,000 रूपये ऑल टाईम हायवर स्थीर झाल्यानंतर ते १.५० ते १.६० लाखाच्या आसपास स्थीर आहेत. त्यांच्या मते यात अजून तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं किंमती लाँग टर्म सपोर्टच्या वर राहण्याची शक्यता आहे.
जाणकारांच्या मते १.४५ ते १.५० लाख रूपयाच्या सपोर्टमध्ये चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे. या बेसच्या वर सतत राहणे आणि त्यानंतर १.६० लाख रूपयांच्या आसपास ब्रेकआईट होण्यामुळं सोन्याचे दर हे १.६५ ते १.७५ लाख रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चांदीचे दर देखील ३ लाख ते ३.२५ लाख रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करण्यात आली आहे.