Gold Silver Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. डॉलरची वाढती ताकद आणि अमेरिकेच्या ट्रेझरी बाँडचे वाढलेले व्याजदर यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, 18 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव आता एक लाख रुपयांच्या खाली आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सलग सहा दिवसांच्या घसरणीत 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव तब्बल 12,060 रुपयांनी कमी झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 11,060 रुपयांची घट झाली आहे.
आज राजधानी दिल्लीतही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट अशा दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी किंवा दागिने खरेदीसाठी सोने घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि मुंबईतील 10 ग्रॅम सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.
दिल्ली
24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,25,710 रुपये
22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,15,240 रुपये
18 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 94,320 रुपये
मुंबई
24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,25,560 रुपये
22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,15,090 रुपये
18 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 94,170 रुपये
पुणे
24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,25,560 रुपये
22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 1,15,090 रुपये
18 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 94,170 रुपये
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी कमी झाल्याचा परिणाम किमतीवर होत आहे. गेल्या 10 दिवसांत एक किलो चांदीचा भाव तब्बल 25,100 रुपयांनी घसरला आहे.
विशेष म्हणजे, या कालावधीत चार दिवस चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. मात्र, उर्वरित दिवसांतील घसरणीमुळे चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. आज चांदीच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली आहे.
सध्या दिल्लीत एक किलो चांदीचा भाव 1,74,900 रुपये आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्येही चांदी याच दराने विकली जात आहे.