Gold Price Record High Pudhari
अर्थभान

Gold Price Record High: सोन्याची ऐतिहासिक वाढ! 46 वर्षांचा विक्रम मोडणार? एका दिवसात किती वाढले भाव?

Gold Price Surge 2025 Record High: सोन्याच्या किमतींमध्ये तेजी कायम असून ते 1979 नंतरच्या सर्वाधिक तेजीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. एका दिवसात 700 रुपयांची वाढ आणि जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.

Rahul Shelke

Gold Set to Break 46-Year Record: सोन्याच्या किमतींमध्ये यंदा मोठी वाढ पाहायला मिळत असून सोनं पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत आणि आता ते 1979 नंतरच्या सर्वाधिक तेजीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

एमसीएक्सवर 5 फेब्रुवारी डिलिव्हरीचे गोल्ड कॉन्ट्रॅक्ट 700 रुपयांहून जास्त वाढीसह उघडले. मागील सत्रात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,27,667 रुपये इतका होता, तर आज तो 1,28,352 रुपयांवर आहे. सोने 713 रुपयांच्या वाढीसह 1,28,380 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते.

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये व्याजदरात कपात करू शकते, या अपेक्षेमुळे सोन्याला मोठा सपोर्ट मिळत आहे. याशिवाय, अमेरिकेत सरकारी शटडाउनमुळे आर्थिक आकडे वेळेवर जाहीर न झाल्याने अनिश्चितता वाढली आहे आणि अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने दमदार कामगिरी करत शुक्रवारच्या सत्रात 4,170 डॉलर प्रति औंसचा टप्पा गाठला. एका आठवड्यात 2% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

गोल्डच्या वाढत्या किंमतीमागे कारणं काय?

नोव्हेंबरमध्ये सोन्यात उच्चांकापासून थोडीशी घसरण झाली असली तरीही ते अजूनही 4,000 डॉलर प्रति औंसच्या वर टिकून आहे. तीन आठवड्यांपासून गोल्ड ETF मध्ये सातत्याने इनफ्लो होत आहे.

त्याहून महत्त्वाचे म्हणजे, जगभरातील सेंट्रल बँका सोन्याची आक्रमक खरेदी करत आहेत. तिसऱ्या तिमाहीत जागतिक केंद्रीय बँकांनी तब्बल 220 टन सोने विकत घेतले, जे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 10% अधिक आहे.

सोन्यासोबत चांदीही तेजीत

सोन्यासोबत चांदीतही तेजी दिसत आहे. एमसीएक्सवरील चांदीचे 5 मार्च डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्ट 1,944 रुपयांच्या वाढीसह 1,67,931 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते. मागील बंद भाव 1,65,987 रुपये होता. आजच्या व्यवहारात चांदीने 1,67,190 रुपये ओपनिंग केली आहे.

सोने आणि चांदीतील ही तेजी जागतिक स्तरावरील अनिश्चिततेत गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे झुकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जर हीच तेजी कायम राहिली, तर सोने यावर्षी 46 वर्षांचा विक्रम मोडताना दिसू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT