Gold Rate Today
सोने दरात सोमवारी (दि.२ जून) वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर आज ८३७ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९६,१९२ रुपयांवर खुला झाला. याआधी सोन्याचा दर ९५,३५५ रुपयांवर होता. दरम्यान, चांदीच्या दरात किरकोळ घट दिसून आली आहे.
इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट दर प्रति १० ग्रॅम ९६,१९२ रुपये, २२ कॅरेट ८८,११२ रुपये, १८ कॅरेट ७२,१४४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ५६,२७२ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ९७,३९२ रुपयांवर आहे.
याआधी एप्रिल महिन्यात सोने दराने १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. चांदीनेही मार्च महिन्यात १ लाख ९०० रुपयांवर व्यवहार करत सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
जगातील वाढत्या व्यापार आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. डॉलरमधील घसरणदेखील सोन्याच्या दरवाढीला कारण ठरली आहे.
२४ कॅरेट सोने हे शुद्ध सोने म्हणून ओळखले जाते. या सोन्याला खरेदीसाठी पहिली पसंत दिली जाते. तर २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिन्यांसाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, सरकारी कर तसेच रुपयाच्या मूल्यातील चढ-उतार आदी कारणांमुळे भारतात सोन्याच्या किमतीत बदल होतो. विशेषतः लग्न सराई आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढते.