Gold Price Today India: देशात सोन्या–चांदीच्या किमतींमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 12,846 रुपये झाला आहे, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 9,634 रुपये प्रति ग्रॅम आहे. एका दिवसात सोन्याच्या भावात तब्बल 700 रुपयांची वाढ झाली आहे.
आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,28,460 रुपये झाली असून ती कालच्या 1,27,750 रुपयांच्या दरापेक्षा 710 रुपये जास्त आहे. 22 कॅरेट सोन्याच्या भावातही वाढ झाली असून 10 ग्रॅमची किंमत 1,17,750 रुपये झाली आहे, जी कालच्या तुलनेत 650 रुपये जास्त आहे. 18 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 96,340 रुपये असून तो कालपेक्षा 530 रुपयांनी वाढला आहे.
मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, केरळ, मैसूर आणि भुवनेश्वरमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 12,846 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 11,775 रुपये तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 9,634 रुपये प्रति ग्रॅम आहे.
दिल्ली, लखनऊ, जयपूर, चंदीगड, गुरुग्राम व गाझियाबादमध्ये 24 कॅरेटचा भाव 12,861 रुपये, 22 कॅरेटचा 11,790 रुपये, तर 18 कॅरेटचा भाव 9,649 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर आज भारतात चांदीची किंमत 176 रुपये प्रति ग्रॅम आणि प्रति किलो 1,76,000 रुपये आहे.
दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये व्याजदर कपात करू शकते अशी शक्यता आहे. व्याजदर कमी होण्याची चिन्हे दिसताच गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता म्हणून विशेषतः सोने खरेदीकडे वळतात. महागाईपासून बचाव करण्यासाठी सोने पारंपरिकरीत्या सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
व्याजदर कमी झाल्यास लोक बचत कमी करून खर्च वाढवतात. वाढत्या मागणीमुळे वस्तूंच्या किमती वाढतात आणि महागाई वाढते. अशा परिस्थितीत सोन्यावरचा विश्वास वाढत जातो आणि त्याच्या किमती झपाट्याने वाढतात.