Gold Silver Rates Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Rates: सोनं झालं स्वस्त; एका दिवसात 1.200 रुपयांची मोठी घसरण, चांदीचे भावही झाले कमी

Gold Silver Rates Today: भारतात आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1200 रुपयांची घट झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold Silver Rates Today: भारतात आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. विशेषतः सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम तब्बल 1200 रुपयांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीतही किंचित घट नोंदवण्यात आली आहे.

भारतात सोने हे केवळ दागिन्यांपुरते मर्यादित नसून गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय मानले जाते. अनेक लोक सोन्याची नाणी, गोल्ड बार तसेच गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करतात. धनत्रयोदशी, अक्षय तृतीया आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय भारतीय लग्नसमारंभांमध्ये सोन्याला विशेष महत्त्व असते.

आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने हे महागाईविरोधातील सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. व्याजदर कमी झाले किंवा आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली की सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित होतात.

आजच्या ताज्या दरांनुसार, राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,53,700 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,40,900 रुपये आहे.

मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,550 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,40,750 रुपये आहे.

चांदीच्या दरातही आज प्रति किलो 100 रुपयांची घट झाली आहे. सध्या देशात एक किलो चांदीची किंमत 2,59,900 रुपये इतकी आहे. म्हणजेच प्रति ग्रॅम चांदीचा दर 259.90 रुपये आहे.

दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये चांदीचा सरासरी दर 2,59,900 रुपये प्रति किलो आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा दर अधिक असून तो 2,69,900 रुपये प्रति किलो इतका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT