Gold Rate Today Pudhari
अर्थभान

Gold Rate Today: सोन्याच्या भावात पुन्हा घसरण! चांदीची चमकही झाली कमी; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today: देशात पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. तर चांदीचाही भाव खाली आला आहे. डॉलरच्या तेजीमुळे आणि फेडरल रिझर्व्हच्या ‘वेट अँड वॉच’ धोरणामुळे सोन्याच्या मागणीत घट झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

Rahul Shelke

Gold price today India gold and silver rates fall Delhi Mumbai Pune

Gold Rate Today: देशात सोन्याच्या भावात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव घटल्याने सोन्याच्या बाजारात मंदीचं वातावरण दिसत आहे. आज 10 नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,22,160 प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे, तर 22 कॅरेट सोनं ₹ 1,12,000 प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे. मागील आठवड्याभरात सोन्याच्या किमतीत तब्बल ₹ 980 प्रति 10 ग्रॅम घट झाली असून, 22 कॅरेट सोनं ₹ 1,160 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

सोन्याच्या घसरणीमागची कारण

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन डॉलरमधील तेजी आणि यूएस फेडरल रिझर्व्हचे ‘वेट अँड वॉच’ धोरण या दोन घटकांमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. सोनं पारंपरिकदृष्ट्या “सेफ अ‍ॅसेट” मानलं जातं म्हणजे अनिश्चित आर्थिक परिस्थितीत गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय. पण जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा जागतिक गुंतवणूकदार सोन्यात कमी गुंतवणूक करतात आणि त्यामुळे भाव घसरतात.

देशातील प्रमुख शहरांतील आजचे भाव

दिल्ली

  • 24 कॅरेट सोनं: ₹1,22,160 प्रति 10 ग्रॅम

  • 22 कॅरेट सोनं: ₹1,12,000  प्रति 10 ग्रॅम

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता

  • 24 कॅरेट सोनं: ₹ 1,22,020 प्रति 10 ग्रॅम

  • 22 कॅरेट सोनं: ₹1,11,850 प्रति 10 ग्रॅम

पुणे आणि बेंगळुरू

  • 24 कॅरेट सोनं: ₹ 1,22,010 प्रति 10 ग्रॅम

  • 22 कॅरेट सोनं: ₹ 1,11,840 प्रति 10 ग्रॅम

जागतिक बाजारातील सोन्याची स्थिती

जागतिक स्तरावरही सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3,996.93 डॉलर प्रति औंस आहे. तरीही, काही जागतिक वित्तसंस्थांनी पुढील काही वर्षांसाठी सोन्याबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे.

गोल्डमॅन सॅक्स (Goldman Sachs) या संस्थेने अंदाज वर्तवला आहे की डिसेंबर 2026 पर्यंत सोनं 4,900 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतं. तर ANZ बँकेचं मत आहे की पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सोनं सुमारे  4,600 डॉलर प्रति औंस होईल.

चांदीच्या भावात घसरण

सोन्यासोबतच चांदीच्याही किमती घसरल्या आहेत. 10 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव ₹1,52,400  प्रति किलो इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव  48.48 डॉलर प्रति औंस पर्यंत खाली आला आहे. भारतामध्ये सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंवर केवळ देशांतर्गत मागणीचा नव्हे, तर आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीचा आणि डॉलरच्या हालचालींचाही मोठा परिणाम होत असतो.

सध्या गुंतवणूकदार सोन्याच्या भावातील या तात्पुरत्या घसरणीकडे “गुंतवणुकीची संधी” म्हणून पाहत आहेत. कारण दीर्घकाळात विशेषतः जागतिक अस्थिरता, निवडणुका आणि व्याजदरांतील बदल या घटकांमुळे, सोन्याचं आकर्षण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञ सांगतात की अल्पकालीन चढ-उतार असूनही, सोनं दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचं सुरक्षित साधन आहे. अनेक वित्त सल्लागार सुचवतात की एकूण गुंतवणुकीच्या 5% ते 10% भाग सोन्यात ठेवावा, जेणेकरून बाजारातील अनिश्चिततेपासून संरक्षण मिळेल.

सध्या सोन्याचे आणि चांदीचे भाव दोन्हीही थोडे घसरले असले, तरी हा घसरणीचा काळ कायमस्वरूपी राहणार नाही. अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार, जागतिक व्याजदर आणि महागाई यांचा पुढील काही आठवड्यांत थेट परिणाम दिसू शकतो. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी घाबरून नव्हे, तर विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT