Gold Price Today Pudhari
अर्थभान

Gold Price Today: सोन्याची चमक पुन्हा वाढली! केला नवा विक्रम; भाव 1.50 लाखांवर जाणार का?

Gold Price Today 2025: अमेरिकेतील कमकुवत रोजगार आकडे आणि व्याजदरात कपातीच्या शक्यतेमुळे सोने महागले. 24 कॅरेट सोने ₹1,30,090 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

Rahul Shelke

Why Gold Prices Are Rising: सोने बाजारात आज पुन्हा एकदा वाढ दिसून आली. तुम्ही आज दागिने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आजचा भाव जाणून घ्या. राजधानी दिल्लीत आज सोन्याच्या भावाने नवा इतिहास रचला आहे.

आज 24 कॅरेट सोने ₹1,30,000 प्रति 10 ग्रॅमच्या वर गेले आणि ₹1,30,090 प्रति 10 ग्रॅम या नव्या उच्चांकावर पोहोचले. तज्ज्ञांचे मत आहे की, ही वाढ इथेच थांबणारी नाही. सेन्को गोल्डचे MD आणि CEO सुवंकर सेन यांच्या मते, ग्लोबल मार्केटचा सपोर्ट कायम राहिला तर सोने लवकरच ₹1.50 लाख प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार करू शकते.

दिल्लीमध्ये सर्वाधिक दर; देशभरातही तेजी कायम

दिल्ली व्यतिरिक्त मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यासारख्या शहरांमध्येही सोन्याचे भाव वाढले आहेत.

  • 22 कॅरेट सोने: ₹1,19,110 प्रति 10 ग्रॅम

  • 24 कॅरेट सोने: ₹1,29,940 प्रति 10 ग्रॅम

चांदीच्या भावात घसरण

आज सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे तर चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव ₹1,86,900 प्रति किलोपर्यंत घसरला आहे. जागतिक बाजारातही चांदीचा भाव $58.17 प्रति औंसपर्यंत खाली आला आहे. ज्यांना चांदीत गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सोन्याच्या भावात वाढ का होत आहे?

अमेरिकेतील रोजगार क्षेत्राचे (Payrolls) ताजे आकडे घसरले असून 2023 नंतरचे हे सर्वात कमकुवत आकडे आहेत. यामुळे US Fed भविष्यात व्याजदर कमी करू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता 9-10 डिसेंबरच्या फेडरल मीटिंगकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

तज्ञांच्या मते:

  • किंमती ₹1.50 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतात

  • सध्या तरी मोठी घसरण होणार नाही

  • जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याचे भाव वाढत आहेत.

  • 2026 मध्ये सोन्याचे भाव नवीन उच्चांक गाठू शकतात, अशी शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT