Gold Silver Rate Today Budget 2026 Pudhari
अर्थभान

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; ग्राहक आणि गुंतवणूकदार सावध

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत.

Rahul Shelke

Gold and Silver Prices Fall on Budget Day: आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. जागतिक बाजारातील घसरण आणि जानेवारी महिन्यात झालेल्या मोठ्या वाढीनंतर गुंतवणूकदारांकडून प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे सोन्या-चांदीचे दर खाली आले आहेत. सराफा बाजारावर याचा थेट परिणाम दिसून आला आहे.

आजचे सोन्याचे दर (1 फेब्रुवारी 2026)

सराफ बाजारात आज सोन्याचे दर कमी झाले आहेत.

  • 24 कॅरेट सोने: 10 ग्रॅमसाठी ₹1,60,580

  • 22 कॅरेट सोने: 10 ग्रॅमसाठी ₹1,47,200

  • 18 कॅरेट सोने: 10 ग्रॅमसाठी ₹1,20,440

सराफ व्यावसायिकांच्या मते, सध्या अनेक ग्राहक दर आणखी घसरण्याची वाट पाहत असल्याने सोन्याची खरेदी मंदावली आहे. बजेटनंतर बाजाराची दिशा स्पष्ट झाल्यावरच खरेदी वाढण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या किमती रोज का बदलतात?

सोन्याच्या दरांमध्ये रोज बदल होण्यामागे अनेक कारणे असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, जागतिक आर्थिक घडामोडी, महागाई, तसेच दागिन्यांची आणि गुंतवणुकीची मागणी या सगळ्यांचा सोन्याच्या किमतींवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पाच्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरूच राहू शकतात.

चांदीच्या दरातही घट

जानेवारी महिन्यात उच्चांक गाठल्यानंतर चांदीच्या दरातही आता घसरण झाली आहे.

  • चांदीचा दर (प्रति ग्रॅम): ₹350

  • चांदीचा दर (प्रति किलो): ₹3,50,000

व्यापाऱ्यांच्या मते, सध्या चांदीची खरेदीही मर्यादित आहे. मात्र काही गुंतवणूकदार कमी दराचा फायदा घेण्यासाठी चांदीकडे वळत आहेत.

सोन्या-चांदीत गुंतवणूक कशी करावी?

सोनं आणि चांदी अजूनही दीर्घकालीन बचतीसाठी सुरक्षित पर्याय मानले जातात. गुंतवणूकदारांकडे आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दागिने, नाणी आणि बार स्वरूपातील प्रत्यक्ष सोने-चांदी खरेदी करता येते. तसेच MCX वरील ट्रेडिंग, गोल्ड आणि सिल्व्हर ETF, तसेच डिजिटल गोल्ड हे आधुनिक पर्यायही उपलब्ध आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला आहे की, दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवूनच गुंतवणूक करावी आणि मोठी खरेदी करण्यापूर्वी बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT