Gen Z Buying Homes Pudhari
अर्थभान

Gen Z Trend: नोकरी लागताच सर्वात अगोदर Zen Z काय खरेदी करत आहेत? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Gen Z Buying Homes: नव्या सर्व्हेनुसार, भारतातील 25 वर्षांखालील तब्बल 32% तरुण स्वतःचं घर खरेदी करत आहेत. 35 वर्षांखालील लोक देशातील 74% घरे घेत असून, Gen Z लवकर आर्थिक निर्णय घेत असल्याचं चित्र दिसत आहे.

Rahul Shelke

Gen Z Home Buying India: आजची Gen Z पिढी म्हणजे फक्त मोबाईल, रील्स आणि मस्ती... असा अनेकांचा समज आहे. पण वास्तव वेगळचं आहे. नव्या सर्व्हेनुसार, आजचे तरुण खूप लवकर आर्थिक निर्णय घेत आहेत. विशेष म्हणजे, 25 वर्षांखालील तब्बल 32 टक्के तरुण थेट स्वतःचं घर खरेदी करत आहेत.

पूर्वी घर घ्यायचं म्हणजे आधी लग्न, मग स्थिर नोकरी, मग बचत… आणि शेवटी घर. पण आजचा तरुण हे पारंपरिक नियम मोडत आहे. नोकरी लागली की लगेच “भाडं का द्यायचं, त्यापेक्षा EMI भरू” असा विचार करून घर घेण्याकडे तो वळत आहे.

35 वर्षांखालील तरुण घेतायत घर

एका सर्व्हेनुसार, भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण घरांपैकी तब्बल 74 टक्के घरे ही 35 वर्षांखालील लोक घेत आहेत. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यातील मोठा हिस्सा 25 वर्षांखालील तरुणांचा आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, आजचा तरुण फक्त वर्तमानात जगत नाही, तर भविष्यासाठीही नियोजन करत आहे.

“स्वतःचं घर” हाच पहिला उद्देश

तरुणांचा विचार अगदी साधा आहे. दरमहा भाडं देण्यापेक्षा तेवढ्याच पैशात EMI भरून स्वतःचं घर का घेऊ नये? म्हणूनच अनेक जण नोकरी लागताच होम लोन घेण्याचा निर्णय घेत आहेत. काही तरुण तर आपल्या पगाराचा मोठा भाग EMI मध्ये देण्यासही तयार आहेत.

सर्व्हे सांगतो की—

  • जास्त पगार असलेले लोक तब्बल 50% उत्पन्न EMI साठी देण्यास तयार आहेत.

  • 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले लोक साधारण 25% EMI भरतात.

  • 11 ते 40 लाख उत्पन्न गटातील लोक 40% पर्यंत EMI देऊन घर घेत आहेत.

  • हे आकडे सांगतात की “स्वतःचं घर” हा आजच्या तरुणांचा प्राधान्यक्रम आहे.

Gen Z स्वतः निर्णय घेतात, कुणाच्या सांगण्यावरुन नाही

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे Gen Z तरुण घर खरेदीचा निर्णय स्वतः घेतात. मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांच्या सल्ल्यावर ते फार अवलंबून राहत नाहीत.

21 ते 24 वयोगटातील केवळ 9% तरुण मित्रांच्या सांगण्यावर घर घेतात. म्हणजे उरलेले बहुतेक जण स्वतः अभ्यास करून, कर्जाचे पर्याय पाहून आणि पुढील आयुष्याचा विचार करून निर्णय घेत आहेत. हे चित्र जुन्या पिढीपेक्षा पूर्ण वेगळं आहे.

बदललेली मानसिकता, बदललेलं अर्थकारण

आज घरांच्या किमती वाढत आहेत, भाडंही वाढतंय. त्यामुळे “लवकर घेतलेलं घर म्हणजे भविष्य काळातला फायदा” ही जाणीव तरुणांना झाली आहे. त्यातच डिजिटल प्लॅटफॉर्म, होम लोन अ‍ॅप्स, ऑनलाइन तुलना, या सगळ्यामुळे घर खरेदी करणं आज खूप सोपं झालं आहे.

थोडक्यात आजचा Gen Z तरुण फक्त करिअर नाही, तर आर्थिक स्थैर्याचाही विचार करत आहे. नोकरी लागताच घर घेण्याचा निर्णय घेणारी ही पिढी “जबाबदार नाही” हा गैरसमज मोडून काढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT